मुंबईत भाजपचं 'सँडविच', तेलही गेलं तूपही गेलं हाती आलं धुपाटणं!

मुंबईत भाजपचं 'सँडविच', तेलही गेलं तूपही गेलं हाती आलं धुपाटणं!

मुंबई महापालिकेच्या 2017 चा निवडणुकीत भाजपनं पहारेकर्‍यांची भूमिका स्वीकारली. कारण त्यावेळी राज्यात शिवसेनेसोबतची युती भाजपला टिकवायची होती.

  • Share this:

मुंबई,23 जानेवारी: मुंबई महापालिकेत भाजप सत्तेतही नाही आणि विरोधक ही नाही. मुंबई महापालिकेच्या 2017 चा निवडणुकीत भाजपनं पहारेकर्‍यांची भूमिका स्वीकारली. कारण त्यावेळी राज्यात शिवसेनेसोबतची युती भाजपला टिकवायची होती. आता मात्र युती तुटली आहे आणि राज्यात भाजप विरोधी पक्ष म्हणून पुढे आला आहे.

मुंबई महापालिकेतही आता भाजपला विरोधी पक्ष म्हणून पुढे यायचं आहे. पण ते होणे इतके सोपे नाही. कारण मुंबई महापालिकेतील विरोधी पक्ष नेता पद भाजपनं नाकारलं होतं. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेला काँग्रेस विरोधी पक्ष आहे. काँग्रेसबरोबर आघाडी केलेले राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष हे ही विरोधी बाकावर बसले आहे. त्यामुळे भाजपची अडचण वाढली आहे. कारण काँग्रेसपेक्षा जास्त नगरसेवक असूनही भाजपला तोपर्यंत हे पद मिळवता येणार नाही, जोवर काँग्रेस सोडत नाही परंतु आता मात्र विरोधी पक्ष होण्यासाठी भाजपची सुरु असलेली अगतिकता पाहता महाविकास आघाडी विरोधी पक्ष नेतेपदही भाजपला सोडण्याच्या मनस्थितीत नाही. म्हणजे ज्या पद्धतीने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी तयार झाली. तसेच तशीच महाविकास आघाडी भाजपला विरोधी पक्ष नेतेपदापासून दूर ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेत एकत्रित येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकेत भाजपचं सँडविच होताना दिसत आहे. म्हणजेच आधी घेतलेल्या भूमिकेमुळे भाजप तब्बल अडीच वर्षानंतर अडचणीत येताना दिसत आहे. त्यातच हे पद भाजपकडे येत्या कालावधीत गेलं तरीही त्यासाठी एप्रिल महिना उजळावा लागेल. कारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पालिकेत समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत.

हेही वाचा..आणखी एक 'ठाकरे' राजकारणात सक्रिय, अमित ठाकरे यांची मनसे नेतेपदी निवड

या निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष यांना कुठली पद्धत किंवा समित्या मिळतात. यावर अनेक बाबी अवलंबून आहेत. या वाटाघाटी यशस्वी झाल्या तरच काँग्रेस विरोधी पक्ष नेता पद सोडेल, अन्यथा त्याच पदावर कायम राहील अशा अवस्थेत भाजपच्या हातून तेलही गेलं तूपही गेलं हाती आलं धुपाटणे, अशी परिस्थिती होईल. पण ही परिस्थिती मुंबईकरांच्या दृष्टीने फारशी चांगली नसेल. कारण त्यामुळे सत्तेतही महाविकास आघाडी असेल आणि विरोधातही अशा वेळी लोकांच्या हितासाठी प्रश्न उपस्थित करणारा कुठलाच पक्ष महापालिकेत सत्तेत अथवा विरोधात नसेल आणि भाजपला कुठलाच अधिकार नसेल.

First published: January 23, 2020, 1:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading