मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

BMC Election 2022: शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू, दगडी चाळीत गवळी अन् नाईक यांची भेट घेत केली राजकीय चर्चा

BMC Election 2022: शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू, दगडी चाळीत गवळी अन् नाईक यांची भेट घेत केली राजकीय चर्चा

Shiv Sena preparation for BMC election 2022: पुढील वर्षी होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 14 ऑक्टोबर : दसरा मेळावा (Shiv Sena Dussehra melava) पूर्वीच शिवसेनेची मुंबई महापालिकेसाठी (BMC Election 2022) मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी (Mumbai Municipal Corporation Election) शिवसेनेने (Shiv Sena) नवरात्र उत्सवाचा मूहुर्त साधत मोर्चेबांधणी करण्यास सुरवात केलीय. मुंबई महापालिकेवर भगवा फडकत ठेवण्यासाठी प्रमूख विरोधी पक्ष भाजपशी (BJP) काटेकी टक्कर द्यावी लागणार आहे. त्यासाठी 113 हा स्पष्ट बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शिवसेनेने अपक्ष आणि इतर लहान पक्षांना आपल्या पंखाखाली घेण्यास सुरवात केलीय.

शिवसेनेच्या या रणनितीचा एक भाग म्हणून काल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी थेट दगडी चाळीत जाऊन नवरात्र उत्सवातील अंबामातेचं दर्शन घेतलं. याच उत्सवात वंदना गवळी, गीता गवळी आणि प्रदिप गवळी यांच्या सोबत अर्धा तास राजकीय चर्चाही केली. त्यानंतर 144 वाँर्ड मधील टेनामेंट नवरात्र उत्सवात जाऊन संतोषी मातेचं दर्शन घेतलं. यावेळीही आश्विन नाईक आणि अंजली अमर नाईक यांची भेट घेऊन त्यांच्याशीही अर्धातास राजकीय चर्चा केली.

या दोन्ही ठिकाणच्या नवरात्र उत्सवात झालेल्या राजकीय गाठी-भेटींमुळे शिवसेनेची मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणनिती संदर्भात चर्चा सुरू झालीय. शिवसेनेला स्पष्ट बहूमत गाठण्यासाठी काही अपक्ष आणि लहान पक्षांच्या नगरसेवकांची मोट बांधावी लागू शकते. त्यासाठी आता नवरात्र उत्सवापासूनच शिवसेनेचे पडद्यामागचे चाणक्य समजले जाणारे मिलिंद नार्वेकर मोर्चे बांधणीच्या कामाला लागल्याचं दिसून आलंय. या आधीही शिवसेनेला मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी गवळी कुटुंबातील दोन नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता. आता पन्हा एकदा पाठिंबा मिळवण्यासाठी शिवसेनेनं मोर्चबांधणी सुरू केल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मनसेच्या मोठ्या नेत्याने फडणवीस यांची घेतली भेट

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पालघरमध्ये मनसे आणि भाजपची युती पाहण्यास मिळाली. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत सुद्धा मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा रंगली आहे. अशातच दोन्ही पक्षांच्या नेत्यांचं एकमेकांच्या घरी येणे जाणे वाढले आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे मंगळवारी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मंगळवारी बोलावण्यात आली होती. या बैठकीआधी बाळा नांदगावकर हे फडणवीसांच्या भेटीला पोहोचले. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आशिष शेलार देखील आधीपासूनच उपस्थित होते. फडणवीसांची भेट घेऊन आल्यानंतर बाळा नांदगावकर यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. 'मी माझ्या वैयक्तिक कामासाठीच आलो होतो. फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. राज ठाकरे यांनीच फोन केला होता, त्यामुळे भेटण्यासाठी वेळ दिला होता. दोन राजकारणी एकत्र भेटले तर राजकीय चर्चा होते असते, असंही नांदगावकर म्हणाले.

First published:

Tags: BJP, BMC, Election, Shiv sena