BMC Election 2022: मुंबई महापालिका 2022 निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा आराखडा तयार, हरकती आणि सुनावणींचा कार्यक्रम जाहीर
BMC Election 2022: मुंबई महापालिका 2022 निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा आराखडा तयार, हरकती आणि सुनावणींचा कार्यक्रम जाहीर
BMC Election 2022: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा आता कधीही होण्याची शक्यता आहे. कारण राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेला त्यानुसार मंजुरी दिली आहे.
मुंबई, 29 जानेवारी : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या (BMC Election 2022) संदर्भात महत्त्वाची बातमी आहे. राज्य निवडणूक आयोगाचं (State Election Commission) पालिका आयुक्तांना पत्र पाठवण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) तयार केलेला वॉर्ड पुनर्रचना आराखड्याला निवडणूक आयोगाने प्राथमिक मंजुरी देण्यात दिली आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये 227 ऐवजी आता 236 वॉर्ड असतील. आता या संदर्भातील प्रारुप आराखडा कसा असेल, आरक्षण कशा पद्धतीने असेल याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून दिली आहे. सोबतच या प्रारूप आराखडा दिल्यानंतर यावर हरकती सूचना मागवल्या जाणार आहेत.
प्रारुप प्रभाग रचनेस मान्यता व निवडणूक प्रभागाच्या सीमा जाहीर करून हरकती व सूचना मागविणे व त्यानुसार सुनावणी देण्याचा कार्यक्रमासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र यामध्ये ओबीसी आरक्षण संदर्भात कुठलाही उल्लेख नाहीये त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसी जागा या खुल्या प्रवर्गातील समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे. या प्रारूप आराखड्यानुसार एकूण मुंबईत महापालिका वॉर्ड 236 असतील.
मुंबई महापालिका एकुण वार्ड 236आरक्षण
खुला प्रवर्ग 219
एससी 15
एसटी 2
महिला जागा
खुला प्रवर्ग 118
एससी 8
एसटी 1
वाचा : मुंबईत मनसेच्या हालचालींना वेग, राज ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजनहरकती व सूचना मागविणे व त्यानुसार सुनावणी देण्याचा कार्यक्रम नेमका कसा असणार ?
1 फेब्रुवारी - निवडणूक प्रभागाच्या सीमा दर्शवणारी प्रारूप अधिसूचना शासन राजपत्र पत्रात प्रसिद्ध करणे व त्यास प्रसिद्धी देणे
1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान प्रारूप आधी सूचनेवर हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी
16 फेब्रुवारी प्राप्त झालेला हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास सादर करणे
26 फेब्रुवारी- राज्य निवडणूक आयोगाचे प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत हरकती व सूचनासंदर्भात सुनावणी देण्याचा अंतिम दिनांक
2 मार्च - सुनावणी नंतर प्राधिकृत अधिकारी यांनी केलेल्या शिफारसी विहित नमुन्यात नमूद करून विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास पाठवण्याचा दिनांक.
राज्य निवडणूक आयोगाने मुंबई मनपाला पत्र लिहून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी मनपाच्या प्रारुप रचनेचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार, महानगरपालिकेच्या निवडणूक प्रभागांची लोकसंख्या, सदस्य संक्या दर्शवणारे सहपत्र 1 अंतिम करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेला त्यानुसार मंजुरी देण्यात आली आहे.
प्रभाग रचना प्रक्रियेला मंजुरी दिल्याने आता निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. कारण, प्रभाग रचना प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तीन दिवसांनंतर कधीही निवडणूक जाहीर करता येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.