...तर मुंबई महापालिकेवर भाजप-आरपीआयचा झेंडा फडकेल; रामदास आठवलेंचा विश्वास

...तर मुंबई महापालिकेवर भाजप-आरपीआयचा झेंडा फडकेल; रामदास आठवलेंचा विश्वास

2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप-आरपीआयचाच झेंडा फडकेल असा विश्वास रामदास आठवलेंनी व्यक्त केला आहे.

  • Share this:

मुंबई, 22 नोव्हेंबर: मुंबई महालिकेच्या निवडणुकीबाबत 2 वर्षाआधीपासूनच चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना आपला गड राखणार की सत्तापालट होणार याबाबत दावे -प्रतिदावे सुरू झाले आहेत. याबाबत केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी बीएमसीच्या निवडणुकांबद्दल महत्वाचं विधान केलं आहे. "आरपीआय भाजपाच्यासोबत आहे. 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये मुंबई महापालिकेवर भाजप-रिपाईंचा झेंडा फडकेल" असा दावा त्यांनी केला आहे.

“शिवसेनेला झटका देण्याची गरज आहे. मुंबई महापालिकेच्या पुढच्या निवडणुकीत नक्कीच सत्तापालट होईल. पण त्यासाठी भाजपला रिपाईची गरज भासणार आहे. भाजप आणि रिपाई एकत्रच लढतील. अशी माहितीदेखील रामदास आठवले यांनी दिली आहे. दरम्यान “मुंबई महापालिकेत भाजपाचा महापौर आणि रिपाईचा उपमहापौर होईल” असं वक्तव्य रामदास आठवलेंनी केलं आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जवळजवळ सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मुंबईत भाजपच्या मुंबई कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली . यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे सोपवून भाजपने निवडणुकीचं बिगूल फुंकलं. 2022 साली मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकणार आहे. राजाचा जीव जसा पोपटात अडकलेला असतो, तसा काहींचा जीव महापालिकेत अडकलेला असल्याचा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेचं नाव न घेता लगावला. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्या खांद्यावर निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे अशी माहिती मिळतेय. बीएमसीच्या निवडणुकीसाठी आघाडी एकत्र येणार का हे येत्या काळात स्पष्ट होईल.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 22, 2020, 8:19 PM IST

ताज्या बातम्या