मुंबई, 13 ऑक्टोबर : मुलुंडमधल्या अपॅक्स Covid-19 हॉस्पिटलमध्ये सोमवारी आग लागली. या हॉस्पिटलच्या ICUमध्येच ही आग लागल्याने प्रचंड गोंधळ उडाला. मात्र सुदैवाने सर्व रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळालं. या वॉर्डमध्ये 39 कोरोना रुग्ण भरती होते. रुग्णालय कर्मचारी आणि फायर ब्रिगेडच्या (Fire Brigade) जवानांनी जीव धोक्यात घालून सर्व रुग्णांना सुरक्षीत बाहेर काढलं.
मुंबई महापालिकेच्या वतीनं या आगीत पांडुरंग दत्तात्रय कुलकर्णी (84) यांचे निधन झाल्याचे सांगितले. पांडुरंग कुलकर्णी हे वर्तक नगर येथे राहत होते, कोरोना झाल्यामुळे त्यांचे अपेक्स रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र नावं सारखी असल्यामुळे मुलुंड येथे राहणारे पांडुरंग द्वारकानाथ कुलकर्णी यांचे निधन झाल्याचे समजून लोकांनी फोन करण्यास सुरुवात केली. मात्र आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पांडुरंग द्वारकानाथ कुलकर्णी यांनी त्यांची भेट घेत, याबाबत माहिती दिली.
I visited Apex Hospital Mulund just now Patient died yesterday is Pandurang D Kulkarni ( Dattatreya) 84 year stays at Vartak Nagar Thane Actually He died yesterday Not Pandurang D Kulkarni (Dwarkanath) 84 year of Mulund Several Persons called Mulund Kulkarni due to similar names
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 13, 2020
किरीट सोमय्या यांनी भेट घेतल्याचा फोटोही ट्वीट केले आहे. नावं सारखी असल्यामुळे पांडुरंग द्वारकानाथ कुलकर्णी यांना आणि त्यांना कुटुंबियांना मात्र त्रास सहन करावा लागला.
दरम्यान, सोमवारी शॉट सर्किटमुळे अपॅक्स रुग्णालयात आग लागल्याची माहिती फायर ब्रिगेडने दिली होती. हॉस्पिटलमध्ये धूर निघत असल्याचं दिसताच रुग्णांना बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. त्यात थोडा जरी उशीर झाला असता तर मोठा अनर्थ घटला असता.
रुग्णवाहिका आणि बसेस मधून या रुग्णांना तातडीने दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहितीही देण्यात आली. जनरेटरमध्ये शॉर्ट सक्रिट झालं आणि आग लागली असावी असा अंदाज फायर ब्रिगडच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.