आमदार, खासदारांप्रमाणे मुंबईच्या नगरसेवकांनाही हवी राज्यभर टोलमाफी

आमदार, खासदारांप्रमाणे मुंबईच्या नगरसेवकांनाही हवी राज्यभर टोलमाफी

मुंबई महापालिकेत ठराव एकमताने मंजूर, आता प्रतीक्षा सरकारच्या निर्णयाची

  • Share this:

मंगेश चिवटे, मुंबई

23 मे : मानधनात पाचपट वाढ करा, अशी मागणी करणाऱ्या मुंबईतील 227 नगरसेवकांना आता टोलमाफीही हवी आहे. अहो , तशी मागणीच सगळ्या नगरसेवकांनी एकमुखाने मान्य केली गेली आहे. व्हिआयपी संसृतीची किती सवय झालीय या रजकारण्यांना याचच हे उदाहरण आहे.

खासदार-आमदारांप्रमाणे सर्व टोलनाक्‍यांवर मुंबईच्या नगरसेवकांनाही विनामूल्य प्रवासाची मुभा द्यावी, असा ठराव महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. हा ठराव राज्य सरकारकडे अभिप्रायासाठी पाठवण्यात येणार आहे.

बर... ही टोलमाफी का आणि कशासाठी? तर म्हणे, मुंबईकरांना विविध सुविधा पुरवण्यासाठी आणि सामाजिक, राजकीय कार्यक्रमांसाठी राज्यभर प्रवास करावा लागतो. अशा वेळी मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक वगळता मुंबईबाहेरील सर्व टोलनाक्‍यांवर टोल भरावा लागतो. खासदार आणि आमदार यांना सर्व टोलनाक्‍यांवर टोलमाफी आहे. म्हणून मुंबई पालिकेच्या नगरसेवकांनाही अशी सवलत द्यावी, असं ठरावात म्हटलं आहे. अहो, पण तुम्ही 50 हजार रुपये पगार घेताय ना, मग कशाला हवी ही टोलमाफी.

आश्चर्य म्हणजे, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिआयपी लाल दिव्यांची संस्कृती संपवावी म्हणून लाल दिव्यावर बंदी घाण्यासारख्या एतिहासिक घोषणा तरतायेत. तर दुसरीकडे, महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांनीही शिवसेनेच्या या ठरावाला पाठींबा दिला आहे. तसं नसतं तर एकमताने ही सुचना मान्य झालीच नसती.

नगरसेवकांच्या या टोलमाफीच्या मागणीला मुंबईकरांनी प्रतिप्रश्न केला आहे.

खर तर मुंबईकरांना टोलमुक्त करणं गरजेच आहे. पाच-पाच ठिकाणी मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवर टोल भरावा लागतो आणि इथे मात्र सेना-भाजपचे नेते ज्यांनी टोलमुक्त करण्याचं वचन दिलंय ते  स्वत:लाच टोलमुक्त करु पाहतायत.

नगरसेवकांच्या सुविधा :

लॅपटॉप, मोबाईल, इंटरनेट कनेक्‍शनसह सिमकार्ड, 10 हजार रुपये मासिक मानधन, बेस्ट बसचा मोफत पास, प्रत्येक सभेचा भत्ता, सर्व समिती अध्यक्षांना पालिकेची गाडी, कार्यालय व कर्मचारी, अभ्यास दौऱ्यांसाठी निधी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2017 12:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading