Home /News /mumbai /

BMC आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची केंद्रात बदली नाही, महत्त्वाची माहिती आली समोर

BMC आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची केंद्रात बदली नाही, महत्त्वाची माहिती आली समोर

मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची केंद्रात बदली करण्यात आल्याच्या चर्चेनंतर एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

    मुंबई, 28 मे : मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची केंद्रात बदली करण्यात आल्याच्या चर्चेनंतर एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. चहल यांची केंद्रात बदली झालेली नसून त्यांना केंद्रीय सचिव पदासाठी पात्र असल्याबाबतचं नियुक्ती पत्र प्राप्त झालं आहे. त्यामुळे चहल यांची केंद्रीय सचिवपदी बदली झाली नसून ते मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणूनच सध्या कार्यरत असणार आहेत. "मला हे सांगताना आनंद होत आहे की भारत सरकारने मला केंद्रीय सचिव पदासाठी पात्र ठरवलेलं आहे. आयएएस अधिकाऱ्याच्या कारकिर्दीतील हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे", अशी माहिती इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे. ('माझ्या वडिलांचा मी आदरच करतो, पण...', वडिलांच्या टीकेवर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया) इक्बाल सिंह चहल हे 1989 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्यांची 8 मे 2020 रोजी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागली होती. त्याआधी ते नगरविकास विभागात प्रधान सचिव होते. चहल यांनी जलसंपदा विभागाचं प्रधान सचिव म्हणूनही काम पाहिलेलं आहे. तसेच आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी मानली जाणाऱ्या धारावी झोपडपट्टीच्या विकासात चहल यांची मोठी आणि महत्त्वाची भूमिका होती. ते धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. ते वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाचे सचिवही होते. तसेच औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. याशिवाय त्यांनी म्हाडाचं अध्यक्षपद आणि उत्पादन शुल्क आयुक्त म्हणूनही काम पाहिलं आहे. मुंबईतील कोरोना परिस्थिती हातळण्यात महत्त्वाची भूमिका मुंबईत कोरोना विस्फोट सुरु होता त्यावेळी मुंबई महापालिकेने प्रचंड मोठं आणि महत्त्वाचं काम केलं. कोरोना संकट कळात लाखो नागरिकांचं निधन झालं. पण कोट्यवधी नागरिकांना वाचवण्यात मुंबई महापालिकेला यश आलं. विशेष म्हणजे मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने महापालिकेपुढे मोठं आव्हान होतं. पण महापालिकेने ते आव्हान लिलया पेललं. या दरम्यान महापालिकेचं नेतृत्व करणाऱ्या इक्बाल सिंह चहल यांची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरली. चहल यांनी वेळोवेळी सर्वसामन्यांशी, महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधत महत्त्वाचं आवाहन केलं. तसेच अनेक नियमांची अंमलबजावणी केली. त्यांच्या अंमलबजावणीमुळेच मुंबईतील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या