मुंबई, 15 एप्रिल: मुंबईतील वांद्रे स्टेशनबाहेर काल (14 एप्रिल) हजारोंचा जमाव जमला होता. लॉकडाऊनचा विरोध करत अनेक कामगार हे गावी जाण्यासाठी हडून बसले होते. उत्तर प्रदेश, बिहारमधील हे लोक होते. पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीचार्ज करून जमाव पांगवला होता. आता मात्र, मुंबई महापालिकेने (BMC)मोठा खुलासा केला आहे.
बीएमसीने याबाबत एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे. वांद्रे स्टेशनबाहेर जमा झालेल्या मोठ्या गर्दीत शास्त्री नगर 1, 2 आणि 3 मधील तसेच महाराष्ट्र नगर भागातील स्थलांतरित 3 हजार लोक होते. त्यात बहुतांशी स्थानिक लोक होते. गावाला जाणारे खूप कमी होते. बीएमसीतर्फे या लोकांना 28 मार्चपासून जेवण दिले जात आहे. जेवणासोबत इतर अत्यावश्यक सेवाही पुरवण्यात येत आहे.मात्र, या नागरिकांना बीएससीचे जेवण नको आहे. त्यांना रेशन आणि पैसे हवे आहेत. अशी माहिती समोर आली आहे.
Mumbai: A large group of migrant labourers gathered in Bandra, demanding for permission to return to their native states. They later dispersed after police and local leaders intervened and asked them to vacate. pic.twitter.com/uKdyUXzmnJ
दुसरीकडे, वांद्रे येथे परप्रांतीयांची गर्दी गोळा करत लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी उत्तर भारतीय संघटना अध्यक्ष विनय दुबे याला पोलिलांनी अटक केली आहे. तसेच तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या ही देशाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. त्यात मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही याची काळजी घ्या, बंधनं पाळा. तुम्ही सध्या आहात तिथेच थांबा, तुम्हा सगळ्यांना निवारा आणि अन्न मिळेल याची व्यवस्था केली जाईल. तुम्ही तुमचा संयम सोडू नका. तुम्हाला घरी जायचं आहे हे मी समजू शकतो. तूर्तास मुंबई सोडू नका, अशा शद्बात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सगळ्या कामगार आणि मजूर वर्गाला आवाहन केलं आहे.