मुंबई महापालिकेत शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपचा 'मेगाप्लान'

मुंबई महापालिकेत शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपचा 'मेगाप्लान'

83 नगरसेवकांच्या बळावर भाजप जेरीस आणण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे यापुढच्या काळात मुंबई महापालिकेच्या राजकारणात दोन्ही पक्षांमध्ये धुमश्चक्री बघायला मिळणार आहे.

  • Share this:

मुंबई 21 जानेवारी : राज्यात भाजप आणि शिवसेनेचं बिनसल्यानंतर आता मुंबई महापालिकेत या दोन्ही पक्षांचा आता 'सामना' होणार आहे. त्यादृष्टीने भाजपने तयारीला सुरुवात केलीय. भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची आज बैठक झाली. त्यात भाजपने पुढची रणनीती ठरवली आहे. या बैठकीनंतर भाजपचे प्रवक्ते आणि आमदार राम कदम यांनी पत्रकारांना माहिती दिली. 2022मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप सत्ता खेचून आणणार आहे. त्यादृष्टीने करण्यासाठी भाजप आता तयारी करणार आहे. मात्र आता मुंबई महापालिकेत भाजप सक्षम विरोधीपक्ष म्हणून काम करेल असं राम कदम यांनी सांगितलं. मुंबई महापालिकेत भाजपचे 83 नगरसेवक आहेत. त्यामुळे शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा भाजप पूर्ण प्रयत्न करणार आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे महापालिकेत शिवसेनेला सध्या कसलीही अडचण येणार नाही. मात्र 83 नगरसेवकांच्या बळावर भाजप जेरीस आणण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे यापुढच्या काळात मुंबई महापालिकेच्या राजकारणात दोन्ही पक्षांमध्ये धुमश्चक्री बघायला मिळणार आहे.

'गोकुळ'ची मलई खाण्यासाठी सगळेच राजकारणी आतुर

मुंबईत आज जिल्हा नियोजन बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीतच पालकमंत्री असलम शेख यांच्या समोर भाजपा आणि शिवसेना आमदारांमध्ये खुर्चीवरून मोठा वाद झाला. पालकमंत्री असलम शेख यांच्या जवळ आदित्य ठाकरे एका बाजूला बसले होते. दुसऱ्या बाजूला मोकळ्या खुर्चीवर भाजपाचे आमदार कालिदास कोळंबकर हे बसण्यास गेले गेले होते. त्यावर शिवसेना आमदार सदा सरवणकर आणि मनीषा कायंदे यांनी हरकत घेतली. मुंबईतील सर्वात जेष्ठ आमदार म्हणून कोळंबर हे पालकमंत्र्यांच्या जवळ खुर्चीवर बसतील असा सूर भाजपाच्या इतर लोकप्रतिनिधींनी  या बैठकीत लावला. त्यानंतर शिवसेना आणि भाजप आमदारांमध्ये कोण खुर्चीवर बसणार यावरून वाद झाला.

'नाईट लाईफ'म्हणजे फक्त दारु पिणं, भाजपच्या नेत्याचं वक्तव्य

या बैठकीमुळे काही काळ तणाव देखील निर्माण झाला. त्यामुळे काही क्षण बैठक स्थगिती झाली. अखेर पालकमंत्री असलम शेख आणि आदित्य ठाकरे यांनी मध्यस्थी करत वाद सोडवला. पण मुद्दा उपस्थित होतोय जिल्हा नियोजन बैठकीत विकास कामांवर शिवसेना-भाजप लोकप्रतिनिधी यांच्यातील मतभेद एक वेळ समजून घेतील पण खुर्चीवरून लोकप्रतिनिधींचा वाद ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे.

First published: January 21, 2020, 8:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या