BMC च्या सहा.आयुक्तांचा कोरोनामुळे मृत्यू, 'हा' रेड झोन आणला होता ग्रीन झोनमध्ये

BMC च्या सहा.आयुक्तांचा कोरोनामुळे मृत्यू, 'हा' रेड झोन आणला होता ग्रीन झोनमध्ये

मुंबई महापालिकाच्या एच पूर्व विभागाचे म्हणजेच वांद्रे विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जुलै: मुंबई महापालिकाच्या एच पूर्व विभागाचे म्हणजेच वांद्रे विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार (वय-56) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. खैरनार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

अशोक खैरनार यांना सुरूवातीला सेवन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा जानवत नसल्यानं त्यांना मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. तिथे उपचार सुरू असतानाच खैरनार यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून तसेच एक भाऊ, दोन बहिणी असा आप्त परिवार आहे.

हेही वाचा.. विरोधी नेते हेल्थ आणि डिझास्टर टुरिझमसाठी फिरताहेत, आदित्य यांचा फडणवीसांना टोला

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील 24 प्रशासकीय विभागांपैकी एच/पूर्व या विभागात रुग्ण वाढ दुप्पट होण्याचा कालावधी 134 दिवसांवर पोहोचलेला आहे आणि येथील रूग्ण वाढीचा सरासरी दरही ०.5 टक्के असा मुंबईतच नाही तर कदाचित देशात देखील सर्वोत्तम आहे. अशी कामगिरी करणारा हा पहिला विभाग ठरला होता. म्हणजेच रुग्णांची वाढ ही अत्यंत कमी करण्यात यश आले होते. या प्रयत्नांमध्ये अशोक खैरनार यांचा मोठा वाटा होता.

अशोक खैरनार हे नेतृत्त्व करत असलेल्या एच पूर्व विभाग कोरोनाला रोखण्यात मुंबईत नंबर वन ठरला आहे. खैरनार यांनी कोरोना विरोधातील लढाईचे नियोजन उत्तन केलं. त्यांनी आपल्या विभागासाठी चतुःसूत्री तयार केली होती. त्याचा सकारात्मक परिणामही समोर आला होता. त्याच्या भागात कोरोना आटोक्यात आता आहे. मात्र, रेड झोन असलेला वांद्रे परिसर ग्रीन झोनमध्ये आणणारे अशोक खैरनार यांचा आयुष्याच्या लढाईत मात्र कोरोनाने पराभव केला.

अशी तयार केली होती चतुःसूत्री...

घरोघरी जाऊन केलेली तपासणी, गरजेनुसार घरीच ऑक्सिजन ट्रिटमेंट, प्रभावी क्वारंटाईन आणि प्रतिबंधित क्षेत्रात कठोर नियमांची अंमलबजावणी अशी चतुःसूत्री सहा. आयुक्त अशोक खैरनार यांनी तयार केली होती.

हेही वाचा...'या' अटींसह राज्यात गणेशोत्सव साजरा करण्यास मान्यता; काय आहेत नियम?

धुळे महानगरपालिका हद्दीतील मोहाडीचे मूळ रहिवासी असलेले खैरनार यांचे शालेय शिक्षण मोहाडीमध्येच झाले होते. विद्युत शाखेतील पदविका शिक्षण त्यांनी धुळे शहरातील शासकीय तंत्रनिकेतन येथून पूर्ण केले आहे. त्यानंतर मुंबईतील व्ही. जे. टी. आय. महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकीय पदवी आणि 'आय. आय. टी. पवई' या सुविख्यात संस्थेतून त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती.

अशोक खैरनार हे फेब्रुवारी 1988 पासून मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत होते. जानेवारी 2018 पासून ते सहाय्यक आयुक्तपदी कार्यरत होते. 'जी उत्तर' विभागाचे सहाय्यक आयुक्त असताना, महापरिनिर्वाण दिनानिमित्त केलेल्या विशेष कामगिरीचा गौरव म्हणून अशोक खैरनार यांना तत्कालिन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते 'जानेवारी 2019' साठी 'ऑफिसर ऑफ द मंथ' या बहुमानाने विशेष सन्मानित करण्यात आले होते.

Published by: Sandip Parolekar
First published: July 11, 2020, 6:56 PM IST

ताज्या बातम्या