Home /News /mumbai /

Corona रुग्णांचा आकडा वाढला, विवाह नोंदणी सेवा तात्पुरती स्थगित; मुंबई पालिकेचा निर्णय

Corona रुग्णांचा आकडा वाढला, विवाह नोंदणी सेवा तात्पुरती स्थगित; मुंबई पालिकेचा निर्णय

मुंबईत (Mumbai) कोरोनाचा (Corona Virus) प्रार्दुभाव वाढताना दिसतोय. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. अशातच मुंबई पालिकेनं (Brihanmumbai Municipal Corporation) नवा निर्णय घेतला आहे.

    मुंबई,17 जानेवारी: मुंबईत (Mumbai) कोरोनाचा (Corona Virus) प्रार्दुभाव वाढताना दिसतोय. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. अशातच मुंबई पालिकेनं (Brihanmumbai Municipal Corporation) नवा निर्णय घेतला आहे. मुंबईत कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता शहरातील विवाह नोंदणी सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. कोविड-19 प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे त्यांनी मुंबईतील विवाह नोंदणी सेवा (Marriage Registration Services) तात्पुरती थांबवली आहे. मुंबई पालिकेनं हा निर्णय घेतला आहे. मुंबई पालिकेनं (BMC) यासंदर्भातलं ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये मुंबई पालिकेनं लिहिलं की, मुंबईतील सध्याच्या COVID-19 परिस्थितीमुळे पालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे विवाह नोंदणी सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. बीएमसीने नमूद केले की विवाह नोंदणी सेवा तात्पुरती स्थगित केली आहे. मात्र नियोजित भेटीसह ही सेवा लवकरच पुन्हा सुरू केल्या जातील. भेटीची तारीख आणि वेळ या सुविधेसह लवकरच सेवा पुन्हा सुरू केली जाईल. पुढे जाऊन बीएमसी व्हिडिओ केवायसी पर्यायाची तरतूद देखील शोधत आहे, असं बीएमसीने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मुंबईत सध्या 60 हजार 371 सक्रिय रुग्ण काल मुंबईत कोरोना रुग्णांची आकडेवारी 7 हजार 895 वर पोहोचली आहे. मुंबईत शनिवारच्या तुलनेने रविवारच्या नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत जवळपास तीन हजारांची घट झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी हा सर्वात मोठा दिलासा मानला जातोय. मुंबईत काल दिवसभरात हजारो रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 11 रुग्णांचा काल दिवसभरात दुर्देवी मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या 60 हजार 371 सक्रिय रुग्ण मुंबईत काल दिवसभरात 21 हजार 25 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे मुंबईत एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 9 लाख 20 हजार 387 इतकी आहे. मुंबई रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 92 टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर डबलिंग रेट हा 48 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत कोरोना संसर्गाचा ग्रोथ रेट हा 1.40 टक्के इतका आहे. तर सध्या 60 हजार 371 रुग्ण सक्रिय आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. मुंबई आणि दिल्ली या दोन्ही मुख्य शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या काही दिवसांपूर्वी 40 ते 50 हजारांच्या घरात पोहोचली होती. त्यामुळे आता परत लॉकडाउन लागणार की काय असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला होता. मात्र आता अचानकपणे हे आकडे कमी होऊ लागले आहेत. मुंबई आणि दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णाचं प्रमाण अधिक आहे त्यामुळे बराच दिलासा मिळाला आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: BMC, Coronavirus

    पुढील बातम्या