मुंबईत हार्बर लाईनवर 4 दिवस मेगा ब्लॉक

मुंबईत हार्बर लाईनवर 4 दिवस मेगा ब्लॉक

बेलापूर-सीवूड्स-उरण रेल्वे मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने कंबर कसली आहे. उरणच्या दिशेने जाणारा नवीन रेल्वे मार्ग हा सीवूड्स आणि बेलापूरच्या रेल्वे मार्गाला जोडण्याचे काम हाती घेण्यात आलं आहे.

  • Share this:

22 डिसेंबर: आजपासून पुढील चार दिवस हार्बर रेल्वेवर नवीन रेल्वेमार्गाच्या कामामुळे मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.यामुळे प्रवाशांना चार दिवस आता रस्ते प्रवासावरच अवलंबून राहावं लागणार आहे.

बेलापूर-सीवूड्स-उरण रेल्वे मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने कंबर कसली आहे. उरणच्या दिशेने जाणारा नवीन रेल्वे मार्ग हा सीवूड्स आणि बेलापूरच्या रेल्वे मार्गाला जोडण्याचे काम हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे आज पासून पुढील 4 दिवस हार्बर मार्गावर ट्रॅफिक ब्लॉक ठेवण्यात आला आहे. या ट्रॅफिक ब्लॉकमुळे हार्बरमार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आलं असून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

आज आणि उद्या हार्बर मार्गावरून धावणाऱ्या 604 गाडयांपैकी 34 गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत. तर 24 आणि 25 तारखेला 482 गाडयांपैकी 12 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सध्याचा हार्बर मार्ग फेज 1 प्रकल्प सीवूड व बेलापूर च्या फलाट क्रंमाक 4 ला जोडण्यात येणार आहे. या कामात सहा ठिकाणी रुळ तोडण्यात येणार आहे. तसेच पुन्हा जोडून त्यामध्ये नव्याने मार्ग तयार करण्यात येणार आहे. या कामासाठी हा ट्रॅफिक ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

कसा आहे मेगा ब्लॉक?

२२-२३ डिसेंबर-

वेळ : गुरुवार-शुक्रवार रात्री २ ते शनिवार-रविवार रात्री २ वाजेपर्यंत (४८ तासांचा ब्लॉक)

स्थळ : बेलापूर फलाट क्रमांक २

- गर्दीचा काळ नसताना बेलापूरहून सुरू होणाºया आणि संपणाºया ६५पैकी ३१ फेºया रद्द. १८ फेºया पनवेलपर्यंत चालविण्यात येतील. नेरूळ येथे ४, वाशी येथे १० आणि मानखुर्द येथे २ फेºया थांबविण्यात येतील. प्रवाशांच्या सुविधेसाठी ट्रान्सहार्बर या वेळापत्रकानुसार धावणार आहेत.

२४-२५ डिसेंबर

शनिवार-रविवार रात्री २ वाजेपासून ते रविवार-सोमवार रात्री २ वाजेपर्यंत (२४ तासांचा ब्लॉक)

स्थळ : बेलापूर फलाट क्रमांक २

२५ डिसेंबर-26 डिसेंबर

वेळ : रविवार-सोमवार पहाटे २ पासून सोमवार दुपार ३ पर्यंत १३ तास

स्थळ : नेरूळ ते पनवेलदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गादरम्यान ब्लॉक

एकूण फेऱ्या : ४८२,

रद्द केलेल्या फेऱ्या : १६४

ट्रान्सहार्बरवरील एकूण सेवा : २३०

रद्द केलेल्या फेºया : ४०

नेरूळ-पनवेलदरम्यान ब्लॉक काळात ट्रान्सहार्बर आणि हार्बर मार्गावरील सर्व लोकल रद्द

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 22, 2017 09:44 AM IST

ताज्या बातम्या