मध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार

मध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार

कल्याणचा 100 वर्ष जुना पत्री पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेने हा ब्लॉक ठेवला आहे.

  • Share this:

मुंबई, 15 नोव्हेंबर : मध्य रेल्वेकडून येत्या रविवारी (18 नोव्हेंबर) सहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याणचा 100 वर्ष जुना पत्री पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेने हा ब्लॉक ठेवला आहे.

या ब्लॉकमुळे लोकलच्या सुमारे 170 फेऱ्या रद्द होणार आहेत. तसंच 40 मेल, एक्स्प्रेसच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे. मध्य रेल्वेकडून रविवारी सकाळी 8 पासून ब्लॉकचं नियोजन करण्यात आलं आहे. यामुळे ठाणे ते कल्याण दरम्यानच्या लोकल फेऱ्यांवर सर्वाधिक परिणाम होणार आहे.

त्यामुळे मनस्ताप टाळायचा असेल तर रविवारी मध्य रेल्वेने प्रवास न करणंच प्रवाशांसाठी सोईचं ठरणार आहे.

नेमका कसा असेल ब्लॉक?

- स. 9:30 ते दु. 3:30 या वेळेत ब्लॉक

- लोकलच्या 170 फेऱ्या रद्द

- 51 लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द किंवा मार्ग बदलणार

- सीएसएमटी-डोंबिवली, कल्याण-कसारा, कर्जत लोकल सुरू राहणार

- कल्याण स्थानकाजवळचा पत्री पूल पाडणार

- पूल 104 वर्षं जुना, धोकादायक म्हणून घोषित

Video : LIC च्या या योजनेत गुंतवा ३५ रुपये, बोनससह मिळतील ४.७२ लाख

First published: November 15, 2018, 12:19 PM IST

ताज्या बातम्या