पेट्रोल पंपावर रिक्षाचा स्फोट; पाच जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक

सीएनजी भरताना हा स्फोट झाल्याची माहिती आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 20, 2018 12:33 PM IST

पेट्रोल पंपावर रिक्षाचा स्फोट; पाच जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक

मुंबई, 20 ऑक्टोबर : कांदिवली येथील पेट्रोल पंपावर आज (शनिवार) सकाळी साडेआठ वाजता रिक्षाचा स्फोट झाला. या स्फोटात पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

जखमी झालेल्या पाच जणांतील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचं रुग्णालयाने सांगितलं आहे. सीएनजी भरताना हा स्फोट झाल्याची माहिती आहे. दुर्घटनेनंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

दरम्यान, सीएनजी भरत असताना अचानक रिक्षाचा स्फोट झाला. त्यामुळे आसपासच्या परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या इतर नागरिकांनी रिक्षात अडकलेल्या जखमींना बाहेर काढलं. जखमींमध्ये तीन रिक्षाचालकांचा समावेश आहे.

दरम्यान, या प्रकाराची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. नेमका सीएनजी गॅसचा स्फोट कसा झाला याचा आता पोलीस तपास करत आहेत. तर या संपूर्ण घटनेमुळे पेट्रोलपंपावर भीतीचं वातावरण पाहायला मिळालं.

घटना घडताच जखमींना तात्काळ उपचार मिळाल्यामुळे सुदैवाने या भीषण स्फोटात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. तर या स्फोटाचा धडा घेत इतर ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने पाऊलं उचलण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहे.

Loading...

त्याचबरोबर असा प्रकार पुन्हा होऊ नये, यासाठी सगळ्याच ठिकाणावरील पेट्रोल पंप आणि सीएनजी पंपांची तपासणी व्हावी अशी मागणी आता वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.

#AmritsarTrainAccident : हा VIDEO सांगेल कसा झाला अपघात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 20, 2018 12:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...