बूचर आयलँडवरील आगीचे पर्यावरणावर विपरित परिणाम; उरण परिसरात काळा पाऊस

बूचर आयलँडवरील आगीचे पर्यावरणावर विपरित परिणाम; उरण परिसरात काळा पाऊस

उरण येथील स्थानिक रहिवाश्यांनी पावासाचं पाणी भरण्यासाठी घराबाहेर बादल्या ठेवल्या होत्या. या बादल्यांमध्ये पावसाचं काळं पाणी जमा झालं. त्यानंतर स्थानिक रहिवाश्यांनी या संदर्भात तलाठी कार्यालयाशी संपर्क करून माहिती कळवली.

  • Share this:

मुंबई,10ऑक्टोबर: गेले तीन दिवस बूचर आयलँडवर लागलेल्या भीषण आगीमुळे आता पर्यावरणावर झालेले परीणाम समोर येऊ लागले आहेत. बूचर आयलँड जवळच असलेल्या उरण परीसरातील डाऊर नगर आणि कोटनाका येथे काल काळा पाऊस पडला आहे.

उरण येथील स्थानिक रहिवाश्यांनी पावासाचं पाणी भरण्यासाठी घराबाहेर बादल्या ठेवल्या होत्या. या बादल्यांमध्ये पावसाचं काळं पाणी जमा झालं. त्यानंतर स्थानिक रहिवाश्यांनी या संदर्भात तलाठी कार्यालयाशी संपर्क करून माहिती कळवली. तलाठी कार्यालयाने पाण्याचे नमुने राज्य प्रदूषण विभागाला तपासणीसाठी पाठवले असल्याची माहिती दिली आहे.

शुक्रवारी संध्याकाळी ४:३० वाजता मुंबई जवळच्या बूचर आयलँडवरील बीपीसीएलचा टँकफाॅर्म क्रमांक १३ वर मुसळधार पावसात वीज पडल्यामुळे भीषण आग लागली होती.

या भीषण आगीत तेलटाकीतील तब्बल ३२ हजार मेट्रिक टन हाय स्पीड डिझेल सतत जळत होतं. हाय स्पीड डिझेल हे अत्यंत ज्वालाग्राही असं इंधन आहे. त्यामुळे लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्नीशमन दलांच्या जवानांना मोठा संघर्ष करावा लागला होता. ही आग विजायला तब्बल 72 तास लागले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2017 10:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading