महाराष्ट्रातील 'या' सुसंस्कृत आणि सुशिक्षितांच्या नगरीत करणी, काळ्या जादूची चर्चा!

सुसंस्कृत शहर असा नावलौकिक मिरवणाऱ्या या शहरात सध्या दहशत पसरलीये ती काळ्या जादूची.

News18 Lokmat | Updated On: Jun 4, 2019 08:44 PM IST

महाराष्ट्रातील 'या' सुसंस्कृत आणि सुशिक्षितांच्या नगरीत करणी, काळ्या जादूची चर्चा!

डोंबिवली, प्रदीप भणगे, प्रतिनिधी, 04 जून: अंधश्रद्धेपोटी डोंबिवलीच्या निवासी विभागात असलेल्या वर्दळीच्या रस्त्यावर अज्ञात व्यक्तीने ठेलेल्या भुताटकीच्या करणी उताऱ्यामुळे नागरिकांसह वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याची चर्चा चालू झाली आहे. विशेष म्हणजे हा उतारा सोमवती अमावस्येच्या पार्श्वभूमीवर ठेवण्यात आला असून या उताऱ्यावर डझनभर अंडी ठेवलेली आढळून आली. मात्र सांयकाळी ही अंडी उताऱ्यावरून गायब झाल्याचे आढळून आले. त्यामुळे ही अंडी भुताने पळवली की काय अशा रंगतदार चर्चेला उधाण आले आहे.

सुसंस्कृत शहर असा नावलौकिक मिरवणाऱ्या डोंबिवली शहरात सध्या दहशत पसरलीये ती काळ्या जादूची. डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी भागात ऐन अमावस्येच्या दिवशी घडलेल्या एका घटनेमुळं नागरिक प्रचंड धास्तावले आहेत. कारण याठिकाणी चक्क एक उतारा आढळून आलाय. ज्या ठिकाणी हा उतारा आढळला, त्या ठिकाणी तीन रस्ते एकत्र येतात. या चौकात पोलिसांसाठी उभारण्यात आलेले आणि सध्या बंद अवस्थेत असलेले निवासस्थान आहे. याच ठिकाणी सोमवारी सोमवती अमावस्येच्या दिवशी एक उतारा ठेवण्यात आल्याचे समोर आले. ज्यात बाहुली, सुया टोचलेले लिंबू, हळदी कुंकू, अंडी, काळा कपडा अशा साहित्याचा समावेश होता. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाने पावले उचलण्याची मागणी इथले रहिवासी राज नलावडे, नंदू ठोसर आणि विवेक देशपांडे करत आहेत.


या सगळ्या प्रकाराबाबत अद्याप पोलिसात कुठल्याही प्रकारची तक्रार देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे तक्रार आली, तर निश्चित कारवाई करू, असे पोलिसांचे म्हणणे आहे. अशाप्रकारचे उतारे आणि काळ्या जादूचा वापर पूर्वी केला जायचा. मात्र अलीकडच्या काळात महाराष्ट्र सरकारचा जादूटोणा विरोधी कायदा आणि जागरूता यामुळे हे प्रकार कमी झाले आहेत. मात्र हे प्रकार एखादा आजार बरा करण्यासाठी पूर्वी केले जात असत असे स्थानिक रहिवासी मारुती उधे यांनी सांगितले.


Loading...

डोंबिवली शहराची गेल्या काही वर्षात इथल्या सांस्कृतिक उपक्रमांमुळे राज्यात वेगळी ओळख निर्माण झालीये. मात्र त्यातही अशाप्रकारचे काळ्या जादूचे प्रकार जर आजच्या काळातही इथे होत असतील, तर हे निश्चितच गंभीर बाब आहे.


VIDEO : तरुणाची कॉलर धरून फरफटत नेलं पोलीस स्टेशनला, तरुणीचा सिंघम अवतार व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2019 08:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...