• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • Corona Vaccination: मुंबईतील अनेक लसीकरण केंद्रावर लसच नाही! BKC केंद्रावर मोठी गर्दी

Corona Vaccination: मुंबईतील अनेक लसीकरण केंद्रावर लसच नाही! BKC केंद्रावर मोठी गर्दी

कोरोनाचे वाढत्या संक्रमणाशी तोंड देण्यासाठी भारतात लसीकरण मोहीम (Coronavirus Vaccination Drive) सुरू करण्यात आली होती. मात्र लशींच्या तुटवड्यामुळे (Shortage of Corona Vaccine) ही मोहीम राबवण्यात अनेक अडथळे निर्माण होत आहे. मुंबईतलही अशीच परिस्थिती आहे

  • Share this:
मुंबई, 24 एप्रिल: कोरोनाचे वाढत्या संक्रमणाशी तोंड देण्यासाठी भारतात लसीकरण मोहीम (Coronavirus Vaccination Drive) सुरू करण्यात आली होती. मात्र लशींच्या तुटवड्यामुळे (Shortage of Corona Vaccine) ही मोहीम राबवण्यात अनेक अडथळे निर्माण होत आहे. मुंबईसारख्या शहरात देखील अनेक लसीकरण केंद्रावर (Vaccination Centers in Mumbai ) कोरोना व्हायरस लशीचा साठाच नाही आहे. BKC मध्ये देखील मुंबईतील महत्त्वाचे आणि मोठे कोव्हिड लसीकरण सेंटर आहे, दरम्यान याठिकाणी आज मोठी गर्दी जमा झाली आहे. लवकरात लवकर लस मिळावी याकरता सकाळपासूनच याठिकाणी मुंबईकरांनी गर्दी केली आहे. मुंबईतील बीकेसी कोव्हिड लसीकरण केंद्रावर मुंबईकरांनी सकाळपासूनच जमा होण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोव्हिड लसीकरण केंद्रावरच ऐन लॉकडाऊनमध्ये (Lockdown in Maharashtra) मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे. मुंबईच्या विविध भागातील लसीकरण केंद्रावर हीच परिस्थिती आहे. (हे वाचा-पुणेकरांसाठी भज्जीचा पुढाकार, अधिकाधिक कोरोना चाचण्या होण्यासाठी केली मोलाची मदत) BMC ने काय केलं होतं ट्वीट- मुंबई महानगर पालिकेने ट्वीट करत अशी माहिती दिली होती की, साठा मर्यादित असून हा साठा उशीरा दाखल होणार आहे. त्यामुळे लसीकरण उशीरा होईल. मुंबईतील अनेक लसीकरण केंद्रावर लशींचा साठा संपल्याने आज उशीरा लसीकरण सुरू होणार होते. बीएमसीने असं ट्वीट केलं होतं की, 'लशींच्या तुटवट्यामुळे कोरोना व्हॅक्सिन सेंटर्सना दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राथमिकता देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. कोरोना लशीचा पुरवठा आज रात्री (23 एप्रिल) होणार असल्याने 24 एप्रिल रोजी लसीकरणाची प्रक्रिया उशीरा सुरू होईल. त्यामुळे त्यानुसार कोव्हिड लसीकरण केंद्रावर येण्याची तुमची योजना आखा.' मात्र असं असलं तरीही अद्याप लसीकरण सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये गोंधळ पाहायला मिळत आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published: