मुंबई, 3 डिसेंबर: विरोधी पक्ष भाजप (BJP) राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aaghadi) टीका करण्याची एकही संधी सोडत नाही आहे. त्यात भाजपनं जोरदार संघटनात्मक हालचाली सुरू केल्या आहे. महाराष्ट्र भाजपचे प्रभारी सी. टी. रवी (C T Ravi) हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर (Mumbai visit) आले आहेत.
महाराष्ट्राचे प्रभारी झाल्यानंतर रवी यांचा हा पहिलाच मुंबई दौरा आहे. नंबर गेमच्या आधारे सरकार आणखी किती दिवस चालणार हा प्रश्चन आहे, असं भाकित सी.टी रवी यांनी मांडलं आहे.
हेही वाचा... आताशी कुठे झाली होती नवदाम्पत्याच्या आयुष्याची सुरूवात, क्षुल्लक वादानं केला घात
भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकाळी रवी यांनी भेट घेतली. मुंबईतील प्रदेश कार्यालय आणि मुंबई पक्ष कार्यालयातील पदाधिकाऱ्यांशी ते दिवसभार चर्चा करणार आहेत. नंतर उद्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. तर या महिन्यात 18 ते 20 डिसेंबर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाही महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
सी.टी.रवी यांनी नागपूरात बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, महाविकास आघाडीचं सरकार फार काळ टिकेल असं दिसत नाही, आपापसातील मतभेदामुळे ते कधीही पडू शकतं, असं भाकीत देखील सी.टी. रवी यांनी केलं आहे.
महाराष्ट्र भाजपचे केंद्रीय प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर रवी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. बुधवारी ते नागपुरात होते. तिथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नवी जबाबदारी मिळाल्यानंतर सर्वप्रथम प्रेरणास्थळी दर्शन घेण्यासाठी नागपुरात आल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारबाबत त्यांनी सवाल केला असता, ते म्हणाले नंबर गेमच्या आधारे सरकार किती दिवस टिकेल, हा प्रश्नच आहे.
मात्र, केवळ संख्या कारणीभूत ठरत नाही तर जनतेचाही विश्वास देखील आवश्यक आहे. पदवीधर आणि शिक्षक आमदारांच्या निवडणुकींचे निकाल जाहीर होतील. त्यातून सरकारला आपल्या अस्तित्वाविषयी संकेत मिळतील, असा टोला देखीव सी.टी. रवी यांनी यावेळी लगावला.
हेही वाचा... राणे पितापुत्र अडकले नव्या वादात, 13 बोलेरो गाड्यांच्या मालकांना बँकेच्या नोटीसा
गोहत्या प्रतिबंधक कायदा, लव्ह जिहाद विरोधा कायद्यासंदर्भात ते म्हणाले, महाराष्ट्रात सध्या भाजपचं सरकार नाही. ते आल्यानंतर उत्तर प्रदेश पॅटर्नवर दोन्ही कायद्यांचा निपटारा करू, असा विश्वास सी.टी. रवी यांनी यावेळी व्यक्त केला आहे.