Home /News /mumbai /

Eknath Shinde : शिंदेंसोबत भाजपचं ऑपरेशन लोटस सुरू, फडणवीसांनी 3 माणसांवर सोपवली जबाबदारी

Eknath Shinde : शिंदेंसोबत भाजपचं ऑपरेशन लोटस सुरू, फडणवीसांनी 3 माणसांवर सोपवली जबाबदारी

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खास या तीन लोकांवर जबाबदारी दिली आहे.ऑपरेशन लोटस याची चर्चा रंगली आहे.

मुंबई, २२ जून : शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (shivsena leader eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार आता अडचणीत सापडले आहे.कालपर्यंत पडद्याआड असलेली भाजप आता सक्रीय झाली आहे.भाजपने आता ऑपरेशन लोटस सुरू केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता भाजप जोडली गेली आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी खास या तीन लोकांवर जबाबदारी दिली आहे.ऑपरेशन लोटस याची चर्चा रंगली आहे. कंबोज, कुटे आणि चव्हाण हे फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे शिंदे यांच्यासह इतर आमदार फडणवीस समवेत थेट संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रवींद्र चव्हाण हे त्यांच्या २०० कार्यकर्त्यांसह गेली ४ दिवस सुरतमध्ये आहेत. विधान परिषद मतदानाच्यादिवशी रवींद्र चव्हाण यांनी शिंदेंसोबत या सर्व आमदारांची सविस्तर बैठक घेतली होती.विधान परिषद ते सुरतपर्यंंत ज्या बसेस आणि खाजगी वाहनांची व्यवस्था केली गेली ती वाहने रवींद्र चव्हाण आणि शिंदे यांच्या काही खास माणसांनी केली होती. आमदार सुरतच्या हॅाटेलमध्ये पोहोचताच रवींद्र चव्हाण यांनी हॅाटेलमध्ये सर्व आमदारांची सविस्तर भेट घेतली. काल दिवसभरात रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यात अनेक मॅरेथॅान बैठका झाल्या. प्रत्येक क्षणाची अपडेट देवेंद्र फडणवीस यांना दिली जात होती. काल रात्री १० वाजता गुवाहाटीला जाण्याचा निर्णय रवींद्र चव्हाण यांनी सेना आमदारांना सांगितला. तसंच मोहित कंबोज हे सुरत मधील पोलीस आणि राजकीय नेत्यांच्या संपर्कात होते. गुवाहाटी येथे रवींद्र चव्हाण यांच्यानंतर भाजपाचा आणखी एका बडा नेता ठाण मांडून आहे.पुढील हालचालींच्या बाबात हे दोन नेते देवेंद्र फडणवीस यांच्या इशारावर करत आहेत. आज रात्री उशीरा सर्व आमदार मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे आपल्यासह ३५ आमदारांना घेऊन आता गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहे.सर्व आमदारांना गुवाहाटीमध्ये रेडिसन ब्लु या हॉटेलमध्ये ठेवले आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल यांची भेट घेण्याची तयारी सुरू केली आहे. एकनाथ शिंदे आजच भेटायची तयारी केली आहे. स्पेशल विमानानं, गुवाहाटीवरून मुंबईत दाखल होणार आहे. त्यांच्या बंदोबस्तासाठी CISF च्या 6 तुकड्या मुंबईत दाखल झाल्या आहेत. विमानतळ ते राजभवन प्रवासाला Cisf ची सुरक्षा असणार आहे. आधीच शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी अजय चौधरी यांची निवड केली आहे. पण सेनेकडे फक्त १७ आमदार असल्याचे पत्र दिले होते. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त आमदार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे दावा करू शकतात. त्यांच्या दाव्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज पहाटे सर्व आमदार हे गुवहाटीला पोहोचले आहे. गुवाहाटीमधील रेडिसन ब्लु या हॉटेलमध्ये या आमदारांना ठेवण्यात आले आहे. या हॉटेलबाहेर मोठा सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सुरत हे मुंबईपासून जवळ असल्यामुळे मध्यरात्रीच सर्व आमदारांना गुवाहाटीला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मध्यरात्रीच सुरतमध्ये असलेल्या बंडखोर आमदारांना गुवाहाटीला नेण्यात आलं. आमदारांपर्यंत कोणी पोहोचू नये यासाठी त्यांना सुरतहून आसामच्या गुवाहाटीमध्ये एअरलिफ्ट करण्यात आले आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण आणि मोहित भारतीय सुद्धा सोबत होते. यावेळी माध्यमांशी बोलत असताना आपण आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं हिंदुत्व सोडलं नाही. हेच हिंदुत्व घेऊन राजकारण करणार, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी नवीन इनिंग सुरू करण्याचे संकेत दिले आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis, Eknath Shinde

पुढील बातम्या