भाजपचा युतीसाठी नवा फाॅर्म्युला, सेनेला 2 जागा वाढवून देण्याचा प्रस्ताव

भाजपचा युतीसाठी नवा फाॅर्म्युला, सेनेला 2 जागा वाढवून देण्याचा प्रस्ताव

सोमवारी जालन्यात भाजपच्या राज्य कार्यकारिणीला सुरूवात होणार आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 27 जानेवारी : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. युतीचं अडलेलं घोडं पुढं दामटण्यासाठी जागा वाटपासंदर्भात भाजपने एक पाऊल पुढे टाकलं आहे. 2014 पेक्षा 2 अधिक जागा देऊन लोकसभेत शिवसेनेशी युती करण्याचा नवा फॉर्म्युला भाजपनं तयार केला, असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

2014 मध्ये भाजपनं 24 तर शिवसेनेनं 2 जागा लढवल्या होत्या आणि उर्वरीत जागा मित्रपक्षांच्या वाट्याला आल्या होत्या. मात्र, यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला 22 जागा देण्याची भाजपची तयारी असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

तसंच काही जागांच्या अदलाबदलीचा प्रस्ताव देखील भाजप शिवसेनेसमोर ठेवणार आहे. ज्यामध्ये हिंगोली, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या जागेचा समावेश असल्याचं कळतंय.

उद्या सोमवारी जालन्यात भाजपच्या राज्य कार्यकारिणीला सुरूवात होणार आहे. त्यावर या नव्या फॉर्म्युलावर चर्चा होऊन त्या अनुशंगानं शिवसेना पक्षप्रमुखांशी संपर्क साधला जाऊ शकतो.

दरम्यान, अलीकडेच भाजपच्या नेत्यांनी युतीबद्दल वेगवेगळी विधान केलं होती. राज्यात शिवसेनेसोबत युती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र युती झाली नाही तर आता लोकसभेत भाजपकडे जेवढ्या जागा आहेत त्यापेक्षा एक जागा भाजप जास्त जिंकेल असा दावा दानवेंनी केला होता.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या होणार असल्याचं राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. तसंच 'युतीचं वैशिष्ट्यं असं आहे की, एखाद्या कुठल्याही दिवशी अचानक युतीची घोषणा होईल', असंही चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

==================

First published: January 27, 2019, 8:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading