उल्हासनगर पालिकेच्या महापौरपदी भाजपच्या मिना आयलानी

उल्हासनगर पालिकेच्या महापौरपदी भाजपच्या मिना आयलानी

  • Share this:

05 एप्रिल : उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या मिना आयलानी यांची निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी जीवन उर्फ राजू इदनानी यांची  बिनविरोध निवड झाली आहे.

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,आरपीआय, पीआरपी या पक्षांनी कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या 3 एप्रिल 2017 च्या निर्णयाचा निषेध करीत सभात्याग केला.

शिवसेनेसोबत सहा पक्षांनी सभात्याग केल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली.

दरम्यान, निवडणुकीपूर्वी सभागृहात कुणी कुठे बसावं यावरून वाद झाला. महापालिका सचिव प्रतिभा कुलकर्णी यांनी प्रभागनुसार बसायला सांगितलं, मात्र भाजप सत्ताधारी आणि बहुमत म्हणून उजव्या बाजूस बसले तर डाव्या बाजुच्या खुर्च्या रिकाम्या राहिल्या आणि शिवसेना नगरसेवक सभागृहात जमिनीवरच बसले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2017 04:49 PM IST

ताज्या बातम्या