Home /News /mumbai /

SC च्या निर्णयानंतर भाजपच्या गोटात आनंदी आनंद, नेते फडणवीसांच्या बंगल्याच्या दिशेने, 5 वा. महत्त्वपूर्ण बैठक

SC च्या निर्णयानंतर भाजपच्या गोटात आनंदी आनंद, नेते फडणवीसांच्या बंगल्याच्या दिशेने, 5 वा. महत्त्वपूर्ण बैठक

सत्ता स्थापनेसाठी भाजपकडूनही तयारी सुरू झाली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून विक्ट्री साइन दाखवण्यात आली. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

    मुंबई, 27 जून : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपच्या गोटात आनंदी आनंद पसरल्याचं दिसत आहे. अनेक ठिकाणी नेते एकमेकांमध्ये मिठाई वाटत आहेत. 11 जुलैपर्यंत बंडखोर 16 नेत्यांवरील कारवाई रोखल्यामुळे एकनाथ शिंदेंना दिलासा मिळाला आहे. लवकरच ते सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचंही सांगितलं जात आहे. याशिवाय शिंदेंसोबत नसलेल्या नेत्यांना अपात्र ठरवण्यात येणार असल्याचंही सांगितलं जात आहे. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी ज्या 16 आमदारांना नोटीस पाठवली आहे, त्या नोटीसीला आमदारांनी उत्तर द्यायला 11 जुलैपर्यंतची मुदतवाढ देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. यानंतर भाजपने कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर नेत्यांच्या या बैठकीच आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीत पुढील योजना ठरवली जाऊ शकते. राज्यपालांनी जर फ्लोअर टेस्ट घेतली तर शिवेसेनेला बहुमत सिद्ध करावं लागेल. व यात शिंदे गटाला यश मिळू शकतो. भाजपकडून सर्व आमदारांना आदेश.. मुंबईबाहेर जाऊ नये असा आदेश सर्व भाजप आमदारांना देण्यात आला आहे. केवळ आमदारच नाही तर नेत्यांनाही मुंबईबाहेर जाऊ नये असे आदेश देण्यात आले आहेत. त्याशिवाय मुंबई बाहेरील आमदारांनाही महाराष्ट्राबाहेर जाऊ नका असाही आदेश देण्यात आला आहे. म्हणजे सत्ता स्थापनेचा दावा करण्याची वेळ आली तर सर्व आमदार तातडीने उपलब्ध होतील. सुधीर मुनगंटींवारांकडून विक्ट्ररी साइन... सत्ता स्थापनेसाठी भाजपकडूनही तयारी सुरू झाली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून विक्ट्री साइन दाखवण्यात आली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजप नेत्यांमध्येही आनंद पाहायला मिळत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: BJP, Devendra Fadnavis

    पुढील बातम्या