राज्यात महिलांवर अत्याचार आणि मंदिर बंद विरोधात भाजपचे 2 दिवस आंदोलन

राज्यात महिलांवर अत्याचार आणि मंदिर बंद विरोधात भाजपचे 2 दिवस आंदोलन

महाविकास सरकार सत्तेत आल्यापासून महिला, तरुणी, बालिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र,

  • Share this:

मुंबई, 12 ऑक्टोबर : महाराष्ट्रामध्ये महिलांवरील होणारे अत्याचार आणि बंद मंदिरांच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज आणि उद्या राज्यभर आंदोलन केलं जाणार आहे.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून महिला, तरुणी, बालिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र, मुख्यमंत्री, गृहमंत्री या अत्याचारांची गंभीरपणे दखल घेत नाहीत, अशी टीका भाजपतर्फे करण्यात आली आहे.

'जिभेची तलवारबाजी लोकं आता...' शिवसेनेचा संभाजीराजेंना सल्ला

त्यामुळे महिला अत्याचाराविरोधात भाजपतर्फे आज राज्यभर आंदोलन केले जाणार आहे. आज होणाऱ्या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सहभागी होतील. मुंबईत शिवाजी पार्क ते चैत्यभूमी असा मोर्चा काढून आंदोलन केलं जाणार आहे.

याच बरोबर मोदी सरकारने केलेल्या 3 कृषी कायद्यांचे स्वागत करण्यासाठी राज्यभर पक्षातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याचा प्रारंभ आज पुणे जिल्ह्यातील वरवंड ते चौफुला अशी ट्रॅक्टर यात्रा काढून होणार आहे. या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सहभागी होणार आहेत.

मराठा आरक्षण स्थगितीचा पहिला फटका, 35 हजार मुलं राहणार प्रवेशापासून वंचित?

राज्य सरकारने मंदिरं उघडण्यास अजून परवानगी दिलेली नाही.या विरोधात 13 ऑक्टोबर म्हणजे उद्या राज्यभर आंदोलन केले जाईल. भाजपच्या प्रदेश अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी येथे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात संत, महाराजांच्या बरोबर मंदिरांवर उपजीविका अवलंबून असणारी छोटी व्यावसायिक मंडळीही सहभागी होणार आहेत.

Published by: sachin Salve
First published: October 12, 2020, 8:29 AM IST
Tags:

ताज्या बातम्या