Home /News /mumbai /

कल्याणमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी केली 'सामना'ची होळी

कल्याणमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी केली 'सामना'ची होळी

सत्तेमध्ये असूनही सतत विरोधी पक्षाची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या सामना या वृत्तपत्राची कल्याणात जिल्हा भाजपतर्फे होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला.

प्रदीप भणगे, कल्याण 11 मे : सत्तेमध्ये असूनही सतत विरोधी पक्षाची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या सामना या वृत्तपत्राची कल्याणात जिल्हा भाजपतर्फे होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. शिवसेनेचे आमदार एकीकडे केंद्रात, राज्यात भाजपबरोबर सत्तेत आहेत. मंत्रीपदही उपभोगत आहेत मात्र तरीही शिवसेना कायम आमच्यावर विरोधी पक्षासारखी टीका करीत आहे. याचा निषेध करण्यासाठी आम्ही सामना पेपरची होळी केल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस यांनी दिली. भाजपबरोबर सत्तेत असणारा शिवसेना पक्ष गेल्या काही महिन्यांपासून जणू काही विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहे. याचा भाजपने यावेळी निषेध करीत शिवसेनाबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून खदखदत असणारा आपला रोष बाहेर काढला. यावेळी उपमहापौर मोरेश्वर भोईर, नगरसेवक महेश पाटील, रमाकांत पाटील, जालिंदर पाटील, चंद्रकांत पाटील, नगरसेविका मनीषा खंडागळे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, यावेळी काँग्रेस निरीक्षक मधु चव्हाण यांच्या पुतळ्यालाही जोडे मारून त्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला.
First published:

Tags: BJP, Kalyan, Shivsena, कल्याण, भाजप, शिवसेना, सामना

पुढील बातम्या