मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

केडीएमसीमध्ये शिवसेनेला धोबीपछाड, मनसेची भाजपला साथ!

केडीएमसीमध्ये शिवसेनेला धोबीपछाड, मनसेची भाजपला साथ!


राज्यामध्ये शिवसेना -भाजपची फाटाफूट झाल्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका स्थायी समिती निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते

राज्यामध्ये शिवसेना -भाजपची फाटाफूट झाल्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका स्थायी समिती निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते

राज्यामध्ये शिवसेना -भाजपची फाटाफूट झाल्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका स्थायी समिती निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते

कल्याण, 3 जानेवारी : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत आज अनपेक्षित निकाल पाहायला मिळाला. भाजपने शिवसेनेला धोबीपछाड करीत स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. भाजपचा हा विजय एकप्रकारे सत्ताधारी शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे मनसेसह काँग्रेसनेही भाजपच्या पारड्यात मत टाकत या विजयामध्ये महत्वाची भूमिका बजावली.

राज्यामध्ये शिवसेना -भाजपची फाटाफूट झाल्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका स्थायी समिती निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच सभापती पदासाठी शिवसेनेच्या गणेश कोट यांच्याबरोबरच भाजप गटनेते विकास म्हात्रे यांनीही अर्ज दाखल केला. त्यामुळे या निवडणुकीत आणखीनच चुरस निर्माण झाली होती.

एकूण 16 सदस्य असणाऱ्या स्थायी समितीमध्ये 8 सदस्य शिवसेनेचे, 6 भाजप आणि मनसे-काँग्रेस प्रत्येकी 1 बलाबल आहे. सदस्य संख्येचा विचार करता शिवसेनेचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, शिवसेना सदस्य वामन म्हात्रे निवडणुकीला गैरहजर राहिले. तरीही महाविकास आघाडी असल्याने काँग्रेस सदस्याचे मत शिवसेनेला जाणार असल्याचे बोलले जात होते.

मात्र, निवडणुकीवेळी प्रत्यक्षात मनसे आणि काँग्रेस सदस्यांनी भाजपच्या पारड्यात मतं टाकली आणि विकास म्हात्रे यांच्या विजयचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेला या अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागले.

भाजपच्या या विजयाबद्दल बोलताना आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं की, शिवसेनेशी आम्ही सातत्याने संपर्कात होतो. परंतु, त्यांच्याकडून आम्हाला दिलेला शब्द पाळण्यात आला नाही. त्यामुळे आम्ही विकास म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आणि हा सत्याचा विजय असून येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटतील, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.

तर या निवडणुकीत अनुपस्थित राहिलेल्या वामन म्हात्रे यांच्यावर पक्ष कारवाई करणार अशी प्रतिक्रिया कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली.

राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा भाजपचा डाव फसला

दरम्यान, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येत महाविकासआघाडी स्थापन केली. परंतु, राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी, काँग्रेस संयुक्तपणे सत्तेत असताना गडचिरोलीत आज जिल्हा परिषदेसाठी वेगळच चिञ तयार झालं.

51 सदस्य असलेल्या गडचिरोली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणाऱ्या भाजपचा डाव फसला. अध्यक्षपदी आदिवासी विद्यार्थी संघाचे अजय कंकडालवार तर उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे मनोहर पाटील पोरेटी यांची निवड झाली. विशेष म्हणजे, भाजपच्या चार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याने आपल्याच उमेदवाराच्या विरोधात मतदान केले.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी सत्तेत आहे. मात्र, गडचिरोली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी भाजपबरोबर तर काँग्रेस आदिवासी विद्यार्थी संघटनेबरोबर गेल्याने वेगळे समीकरण तयार होवून निवडणुकीत चुरस निर्माण झाली.

अध्यक्षपदासाठी आविसचे अजय कंकडालवार यांनी नामांकन दाखल केलं. तर भाजपनेही आपल्याकडे मॅजिक फिगर असल्याचं सांगत नामदेव सोनटक्के यांचे नामांकन दाखल केलं. तर उपाध्यक्षपदासाठी भाजपकडून नाना नाकाडे, युधिष्टिर विश्वास यांनी तर काँग्रेसतर्फे मनोहर पोरेटी, राम मेश्राम यांनी नामांकन भरले. परंतु, नाना नाकाडे आणि राम मेश्राम यांनी नामांकन मागे घेतले.

सभागृहात हात उंचावून मतदानाला सुरुवात झाली तेव्हा भाजपच्या चार सदस्यांनी तर राष्ट्रवादीचे जगन्नाथ पाटील बोरकुटे यांनी अजय कंकडालवार यांच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे अध्यक्षपदी अजय कंकडालवार  22 विरुद्ध 29 मतांनी विजयी झाले. तर मनोहर पाटील पोरेटी यांची 22 विरुद्ध 29 मतांनी उपाध्यक्षपदी निवड झाली.

First published:

Tags: BJP