मुंबई : शिवसेनेच्या हातातून सत्ता काढून घेण्यासाठी भाजपची तयारी!

मुंबई : शिवसेनेच्या हातातून सत्ता काढून घेण्यासाठी भाजपची तयारी!

'आमच्या बापाने आपला संसार नीट करावा हे सांगितलं विनाकारण दुसऱ्याच्या संसारात लक्ष नको, त्यामुळे खातेवाटपाच्या विलंबावर बोलणार नाही.'

  • Share this:

सागर कुलकर्णी,  मुंबई 09 डिसेंबर : महाराष्ट्रात सत्तेच्या नाट्यात भाजपला शिवसेनेने धोबीपछाड दिला. त्याचा वचपा काढण्यासाठी भाजप आता तयारीला लागला आहे. शिवसेनेचा गड असलेल्या मुंबईत गेल्या तीन दशकांमध्ये शिवसेनेचा एकछत्री अंमल आहे. प्रचंड मोठं बजेट असलेल्या मुंबई महापालिकेत आपली सत्ता कायम राहावी म्हणून शिवसेना पूर्ण शक्ती पणाला लावते. शिवसेनेचा हा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली असून आज मुंबईत झालेल्या भाजपच्या महत्त्वाच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा करण्यात आली असून भाजपने त्यासाठी मेगा प्लान तयार केल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलीय. त्यामुळे यापुढे भाजप आणि शिवसेनेत मुंबईत जोरदार लढत होणार आहे.

छेडछाड करणाऱ्यांना भररस्त्यातच ठेचू, विद्यार्थिनींचा एल्गार

चंद्रकांत पाटील म्हणाले, 2022 मुंबई मनपा भाजपा एकहाती जिंकेल यासाठी जास्त काम येथे करू. 2022 मध्ये मुंबईत भाजपचा महापौर होईल हे आमचं टार्गेट आहे. त्यासाठी आम्ही आतापासूनच कामाला लागणार आहोत. त्यामुळेच दिवसभर आम्ही आज मुंबईवरच चर्चा केली. 30 तारखे पर्यंत मुंबई भाजपचा नवीन अध्यक्ष घोषणा होईल असंही ते म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटप लांबल्याच्या घटनेवर पाटील म्हणाले, आमच्या बापाने आपला संसार नीट करावा हे सांगितलं विनाकारण दुसऱ्याच्या संसारात लक्ष नको यावर आता बोलायचे नाही. भाजपाने अजित पवार यांना क्लिनचिट दिले नाही. आताच्या सरकारच्या काळात अजित पवार यांच्याबाबत प्रतिज्ञापत्र दिलं आहे असंही त्यांनी सांगितलं. पाटील पुढे म्हणाले,1 ते 5 जानेवारी कालावधीत प्रदेश अध्यक्ष नवीन घोषणा होईल.

हॉस्पिटलमधून 28 दिवसानंतर घरी परतल्यावर लता मंगेशकरांनी केलं हे भावुक ट्वीट

खडसे हे 1978 पासून भाजपा काम करत मोठे झाले. भाजपा संघटनेत खडसे यांचा मोठा वाटा आहे. ते नेते आहेत, ते वेगळा विचार करणार नाहीत. खडसे यांच्याशी दीर्घ चर्चा झाली. त्यांना आश्वासन दिले. जे चुकीचे झाले त्यांवर कारवाई करू असं त्यांना आश्वासन दिलं असंही त्यांनी सांगितलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 9, 2019, 7:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading