मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

‘सरकार पाडण्याची योजना नाही, पाडणारही नाही, मात्र पडलंच तर...’ फडणवीसांचे  सूचक संकेत

‘सरकार पाडण्याची योजना नाही, पाडणारही नाही, मात्र पडलंच तर...’ फडणवीसांचे  सूचक संकेत

राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्याबाबत कायम शंका उपस्थित केल्या जातात. भाजप ठाकरे सरकार पाडण्याच्या प्रयत्नात आहे असंही कायम बोललं जात असतं.

राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्याबाबत कायम शंका उपस्थित केल्या जातात. भाजप ठाकरे सरकार पाडण्याच्या प्रयत्नात आहे असंही कायम बोललं जात असतं.

राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्याबाबत कायम शंका उपस्थित केल्या जातात. भाजप ठाकरे सरकार पाडण्याच्या प्रयत्नात आहे असंही कायम बोललं जात असतं.

मुंबई 07 डिसेंबर: राज्यातलं महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्याबाबत कायम शंका उपस्थित केल्या जातात. भाजप ठाकरे सरकार पाडण्याच्या प्रयत्नात आहे असंही कायम बोललं जातं. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पुन्हा एकदा यावर आपली भूमिका स्पष्ट करत सूचक संकेतही दिले आहेत. या आधीही त्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. आपसातल्या मतभेदांमुळेच हे सरकार गडगडेल असंही भाजपच्या नेत्यांनी म्हटलं होतं. फडणवीस म्हणाले, राज्यातलं महाविकास आघाडी सरकार पाडण्याची आमची योजना नाही, आम्ही सरकार पाडणारही नाही, तशी इच्छाही नाही. मात्र पडलंच तर पर्यायी सरकार देण्याची आमची तयारी आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने केलेल्या कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारलं आहे. त्यासाठी 8 डिसेंबरला भारत बंदची हाकही दिलीय. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राजकीय पक्षांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोपही केलाय. ते म्हणाले, केंद्र सरकारने जे कायदे केले आहेत ते कायदे महाराष्ट्रासह अनेक राज्यात लागू आहेत. केवळ मोदी सरकारला विरोध करण्यासाठी राजकीय पक्ष भारत बंदला पाठिंबा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शेतकरी आंदोलनात या अनोख्या नागीण डान्सचा VIDEO VIRAL फडणवीस यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या आधी घेतलेल्या भूमिकेचा उल्लेख करत त्या पक्षांनी या कायद्यांना समर्थन दिल्याचं सांगितलं. या पक्षांची भूमिका ही दुटप्पी असल्याचंही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ज्या कायद्यांच्या संदर्भात आंदोलन सुरु आहेत, ते कायदे राज्यात 2006मध्ये करण्यात आले होते.काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत असताना हे कायदे करण्यात आले, खासगी एपीएमसी स्थापन करण्यात आल्या. मला आश्चर्य वाटतं की राज्यात ज्या गोष्टी झाल्या त्या केंद्राने केल्या तर यांना आक्षेप आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात या गोष्टी लिहिलेल्या आहेत असंही ते म्हणाले. बाजार समित्या रद्द करण्यात येईल असं काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात लिहिलं आहे.  27 डिसेंबर 2013मध्ये राहुल गांधी यांनी पीसीमध्ये एपीएमसीमधून भाजीपाला आणि फळे काढण्यात येतील असं सांगितलं होतं. हा आहे धोनीच्या शेतातला ऑरगॅनिक कोबी, बाजारात तुफान मागणी पवार यांनी 2010मध्ये अनेक पत्र लिहून कृषी सुधारणा सुचवल्या होत्या. शरद पवार यांच्या आत्मचरित्रात याचा उल्लेख. अधिक व्यापक चर्चा व्हायला हवी असं पवार म्हणाले आहेत. डीएमकेनं 2016 साली असंच काही आश्वासन दिलं होतं. आप ने हे कायदे मंजूर केलेत. अकाली दल 12 डिसेंबर 2012 रोजी एपीएमसी दलालांचे अड्डे बनले आहेत असं म्हटले होते. राजकीय पक्षांचा विरोध म्हणजे वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा प्रकार असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
First published:

Tags: Devendra Fadnavis, Uddhav Thackeray (Politician)

पुढील बातम्या