राज्यात पुन्हा भाजपचचं सरकार येणार, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

राज्यात पुन्हा भाजपचचं सरकार येणार, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

'राज्यात भाजपशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नाही. सत्ता स्थापनेवेळी मुंबईत बोलावू पण आता लोकांमध्ये जाऊन काम करा.'

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई 14 नोव्हेंबर : राज्यात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चर्चा सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलंय. राज्यात पुन्हा एकदा भाजपचचं सरकार येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीत हा विश्वास व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. राज्यात भाजपशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नाही असंही ते म्हणाले. सत्ता स्थापनेवेळी मुंबईत बोलावू पण आता लोकांमध्ये जाऊन काम करण्याचा सल्लाही त्यांनी नव्याने निवडून आलेल्या आमदारांना दिला. या बैठकीला भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. आजच्या बैठकीत आमदारांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्नही भाजपच्या नेत्यांनी केला. यावेळी प्रेझेंटेशनद्वारे विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीचं विश्लेषण करण्यात आलं. आपलंच सरकार पुन्हा येणार हे शेतकऱ्यांना बांधावर आणि लोकांमध्ये जाऊन सांगा असंही ते म्हणाले.

VIDEO : आघाडीच्या नेत्यांसोबत बैठकीनंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

'भाजप सेनेनं एकत्र आलं पाहिजे'

'शिवसेनेने अन्य कोणत्याही पर्यायाचा विचार न करता भाजप या आपल्या जुन्या मित्रासोबत एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन करावं. भाजपनेही दोन पाऊले मागे जाऊन महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेनेसोबत तडजोड करून सत्ता स्थापन करावी. 30 वर्षे जुन्या युती च्या भाजप शिवसेना या दोन्ही पक्षांना एकत्र आणून त्यांच्यात दिलजमाई करण्याचा मी प्रयत्न करणार आहे,' असा इरादा आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी बोलून दाखवला आहे.

हिंमत असेल तर अडवा, राजभवनावर रात्री 12 वाजता धडकणार - बच्चू कडू

'मी मुंबई आल्यानंतर भाजपचे विधिमंडळाचे नेते  देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, शिवसेना विधिमंडळ नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणे फार चांगले नाही,' असं रामदास आठवले यांनी दुबई येथून पाठविलेल्या संदेशात व्यक्त केले आहे. सध्या ते दुबई दौऱ्यावर आहेत.

मुंबई महापौर निवडणुकीच्या तोंडावर BMC कॉन्ट्रॅक्टर्सवर Income Tax चे छापे

राज्याच्या सत्ताकारणात शिवसेनेने भाजपची सोडलेली साथ, राज्यात असलेली राजकीय अस्थिरता आणि तोंडावर आलेली महापौरपदाची निवडणूक, या पार्श्वभूमीवर BMC कॉन्ट्रॅक्टर्सवर Incom Taxचे छापे पडले आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रातल्या 37 ठिकाणी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर्सवर इन्कम टॅक्सने छापे घातले. Incom Taxच्या या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रातील एन्ट्री ऑपरेटरवरही छापे घालण्यात आलेत. या छाप्यांमध्ये इन्कम टॅक्सला 735 कोटींच्या बोगस एन्ट्री आणि बनावट खर्चाचे पुरावे सापडल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. बीएमसीसाठीच्या सरकारी प्रकल्पांच्या निधीचे पैसे लाटल्याचं इन्कम टॅक्सला आढळल्याची माहिती पुढे आलीय.  सध्याच्या राज्यातल्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर या छाप्यांना महत्त्व प्राप्त झालंय. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 14, 2019, 11:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading