Home /News /mumbai /

विधान भवनात ग्रामपंचायत विधेयकावरून राडा, भाजपने केला सभात्याग

विधान भवनात ग्रामपंचायत विधेयकावरून राडा, भाजपने केला सभात्याग

ग्रामपंचायत सुधारणा विधेयकाला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला.

    मुंबई, 07 सप्टेंबर : कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यापासून बंद पडलेले विधिमंडळाचे कामकाज आज सुरू झाले. पण विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिल्याच दिवस हा वादळी ठरला आहे. ग्रामपंचायत सुधारणा विधेयकावरून विधानसभेत एकच गोंधळ पाहण्यास मिळाला आहे. भाजपने राज्य सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेत सभात्याग केला आहे. अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर अजित पवारांनी  2020-21 पुरवणी मागण्या मांडल्या. यात ग्राम पंचायतीमध्ये प्रशासक नेमणूक करण्यात आली होती. त्याबद्दल विधेयक मांडण्यात आले होते. परंतु, भाजपने या विधेयकावर जोरदार आक्षेप घेतला. ग्रामपंचायत सुधारणा विधेयकाला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. ग्रामपंचायत प्रशासक नेमणुकीबाबत  उच्च न्यायालयाने निर्णय दिला असताना पुन्हा हे विधेयक का? जो वाद न्यायालयात आहे त्यावर अध्यादेश काढायची घाई का? असा सवाल उपस्थितीत केला होता. तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी फडणवीस यांचा दावा खोडून काढला. तुमची माहिती अपूर्ण आहे.  5 वर्ष सरपंच कसा यावा, याबाबत नियम आहे. पण 5 वर्षांनंतर काय करावं याबाबत कायदा नाही, असं हसन मुश्रीफ यांनी सांगितले. पण, त्यानंतर  ग्रामपंचायत सुधारणा विधेयक विधानसभेत मांडण्याप्रकरणी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.  घोषणाबाजी करून विरोधकांचा विधानसभेतूतन सभात्याग केला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या