मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

...अन्यथा आपण ही या पापात सहभागी, उमा भारतीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

...अन्यथा आपण ही या पापात सहभागी, उमा भारतीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

साधूंवर हल्ला झाला तेव्हा पोलीस काहीच करत नाहीत आणि जमावाला सोपवितात, या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी.

साधूंवर हल्ला झाला तेव्हा पोलीस काहीच करत नाहीत आणि जमावाला सोपवितात, या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी.

साधूंवर हल्ला झाला तेव्हा पोलीस काहीच करत नाहीत आणि जमावाला सोपवितात, या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी.

  • Published by:  sachin Salve

पालघर, 21 एप्रिल : पालघरमध्ये चोर समजून दोन साधू आणि चालकाला जमावाने दगडाने ठेचून मारले. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात आता केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या उमा भारती यांनी उडी घेतली आहे. उमा भारती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

'आपण हिंदुह्रदयसम्राट यांचे पूत्र आहात आणि तुम्हाला  साधू संतांविषयी आपुलकी आहे. पालघर येथील घटना ही दुर्दैवी आहे. साधूंवर हल्ला झाला तेव्हा पोलीस काहीच करत नाहीत आणि जमावाला सोपवितात, या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी. साधूंना न वाचवणाऱ्या पोलिसांवर 302 चा गुन्हा दाखल करून कारवाई करावी, जर दोषींवर योग्य ती कारवाई केली नाहीतर आपण ही या पापात सहभागी झाले सारखा असाल', अशी टीका भारती यांनी केली.

हेही वाचा -3 मेनंतर असा असेल लॉकडाऊनचा एक्झिट प्लान, मोदी सरकारची Exclusive स्टोरी

तसंच,  या प्रकरणाचे प्रायश्चित म्हणून मी भोपाळमध्ये आजपासून उपवास करणार आहे. तसंच इतर साधूंनीही घटनेच्या निषेधात उपवास करावे, असं आवाहनही त्यांनी केलं.

जेव्हा लॉकडाउन संपेल त्यानंतर मी घटनास्थळी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहणार आणि माफी मागणार आहे, असंही भारती यांनी आपल्या पत्रात लिहिली आहे.

दरम्यान, आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून या प्रकरणावरून भाजपवर पलटवार करण्यात आला आहे. पालघरमधील ज्या गडचिंचले गावात ही दुर्घटना घडली ते गाव व ग्रामपंचायत गेली दहा वर्षे पूर्णपणे भाजपच्या ताब्यात आहे. सरपंच भाजपचाच आहे. म्हणजे मारहाण करणार्‍यांचा रंग कोणता, हे सांगायला नको, असं म्हणत शिवसेनेनं थेट भाजपवर हल्लाबोल केला आहे.

'हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राज्यात हिंदू साधूंची हत्या होते यावर काहींनी चिंता व्यक्त केली आहे. या चिंतेमागचे खरे कारण वेगळेच आहे. विरोधी पक्षनेत्यांनीही समाज माध्यमांवर या घटनेवरून अश्रूंचा पूर वाहिला आहे. पण याआधी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात धुळय़ात पाच आणि चंद्रपुरात एका हिंदू गोसाव्याची जमावाने अशीच निर्घृण हत्या केली होती. तेव्हा हा हिंदुहृदयसम्राटांचा महाराष्ट्र नव्हता काय?' असा थेट सवाल विचारण्यात आला आहे.

हेही वाचा - पालघर प्रकरणावरून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, उज्ज्वल निकम म्हणाले...

'गोमांस भक्षणप्रकरणी दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेशात सतत मॉब लिंचिंग झाले, पण मरणारे मुसलमान  होते म्हणून बेगडी हिंदुत्ववादी उन्मादाने नाचत होते. हत्या कोणाचीही असो, ती वाईटच. एखाद्याच्या हत्येने जो आनंद व्यक्त करतो ती एक विकृतीच मानावी लागेल. मग आपल्यात व  ओसामा बिन लादेन, मसूद अझहर वगैरे निर्घृण लोकांमध्ये फरक काय? मॉब लिंचिंग एक विकृती आहे व या विकृतीचे समर्थन कोणालाही करता येणार नाही. पालघरच्या घटनेनंतर एका विशिष्ट विचारांचे तसेच संस्था आणि संघटनेशी संबंधित लोक बोलू आणि लिहू  लागले आहेत. हेसुद्धा खतरनाक आहेत' अशी चिंताही सेनेनं व्यक्त केली.

संपादन - सचिन साळवे

First published: