प्रज्ञासिंह यांची संरक्षण समितीतून हकालपट्टी; 'नथुराम'संबंधी वक्तव्य भोवलं

प्रज्ञासिंह यांची संरक्षण समितीतून हकालपट्टी; 'नथुराम'संबंधी वक्तव्य भोवलं

नथुराम गोडसे यांना पुन्हा 'देशभक्त' संबोधणाऱ्या भोपाळच्या भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर अडचणीत सापडल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली,28 नोव्हेंबर: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे यांना पुन्हा 'देशभक्त'संबोधणाऱ्या भोपाळच्या भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर अडचणीत सापडल्या आहेत. प्रज्ञासिंह ठाकूर यांची संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय समितीच्या सल्लागारपदावरून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रज्ञासिंह ठाकूर यांनी संसदेत केलेले कथित वक्तव्य अत्यंत निंदनीय असून भाजप अशा विचारधारेचे समर्थन करत नाही, असे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सांगितले आहे. प्रज्ञासिंह यांना आता भाजपच्या संसदीय बैठकीतही सहभागी होता येणार नसल्याचेही नड्डा यांनी सांगितले आहे.

दरम्यान, खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी बुधवारी लोकसभेत एका चर्चा सत्रात महात्मा गांधींची हत्या करणारे नथुराम गोडसे यांन देशभक्त संबोधले होते. त्यावरून लोकसभेत एकच गदारोळ झाला होता. याआधी लोकसभा निवडणूक सुरू असतानाही गोडसेला देशभक्त संबोधले होते. प्रज्ञा यांना कधीही मनापासून माफ करू शकणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.

खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर या त्यांच्या वादग्रस्त वक्यव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. बुधवारी लोकसभेमध्ये एसपीजी संशोधन विधेयकावर चर्चा करताना महात्मा गांधी यांचे हत्यारे नथूराम गोडसे याला 'देशभक्त' नावाने संबोधले. याला काँग्रेसने कडाडून विरोध केला. डीएमके सदस्य ए राजा यांनी चर्चा करताना गोडसेचे उदाहरण दिले. तेव्हा प्रज्ञासिंह आपल्या जागेवर उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या की, 'देशभक्तांची उदाहरणे देऊ नका'. यावर काँग्रेसच्या काही सदस्यांनी नाराजी व्यक्त करून कडाडून विरोध दर्शवला. त्यानंतर या दरम्यान संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रज्ञासिंह यांनी खाली बसण्यासाठी इशारा केला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी कॉंग्रेस सदस्यांना शांत बसण्याचे आवाहन केले.

दरम्यान, प्रज्ञासिंह यांनी याआधीही गोडसेला 'देशभक्त' असे संबोधले होते. तेव्हाही मोठा वाद झाला होता. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त करत पुन्हा कोणी अशी चूक केल्यास त्याला माफ केले जाणार नाही, असा इशारा दिला होता.

नियुक्तीवर तीव्र आक्षेप..

साध्वी प्रज्ञा यांची संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय समितीच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. संरक्षण मंत्री अध्यक्ष असलेल्या या समितीत 21 जण सदस्य आहेत. काँग्रेसने साध्वीच्या नियुक्तीवर तीव्र आक्षेप घेतला होता तर भाजपने या नियुक्तीचा बचावही केला होता. साध्वी प्रज्ञा या भोपाळच्या खासदार असून त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजयसिंग यांचा पराभव केला होता. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी भाजपवर टीका करताना म्हटलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महात्मा गांधींच्या तत्वज्ञानाचा कायम उल्लेख करतात आणि वादग्रस्त असलेल्या साध्वीची संरक्षण सल्लागार समितीवर नियुक्ती केली जाते हा भाजपचा दुटप्पीपणा आहे.

तर काँग्रेसचे दुसरे नेते जयवीर शेरगील यांनीही ट्विटरवरून काँग्रेसवर निशाणा साधला होता. भाजपने राष्ट्रवादीचे नवे मॉडेल तयार केले. ज्यांच्यावर बॉम्बस्फोटाचा आरोप आहे, अशा लोकांना खासदार केले आणि आता संरक्षण मंत्रालयाच्या समितीवर नियुक्तीही केली. त्यामुळेच गोडसे भक्तांना अच्छे दिन आले असेही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले होते.

<iframe src="https://www.youtube.com/embed/18haW_ar0h8" width="720" height="350" frameborder="0" allowfullscreen="allowfullscreen"></iframe>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2019 11:20 AM IST

ताज्या बातम्या