बाबासाहेबांचं नाव घ्यायची औकात आहे का?, मुख्यमंत्री विरोधकांवर बरसले

"ही संविधान बचाव रॅली नाहीये तर पक्ष बचाव रॅली आहे. संविधानाच्या आड पक्ष बचावण्याचा हा प्रयत्न आहे"

Sachin Salve | Updated On: Jan 26, 2018 06:16 PM IST

बाबासाहेबांचं नाव घ्यायची औकात आहे का?, मुख्यमंत्री विरोधकांवर बरसले

25 जानेवारी : संविधानाला वाचवणारे तुम्ही कोण? संविधान सक्षम आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घ्यायची यांची औकात आहे का? असा सवाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांवर बरसले. मात्र, घसा बसल्यामुळे मुख्यमंत्र्यांना भाषण आटोपतं घ्यावं लागलं.

विरोधकांच्या संविधान बचाव रॅलीविरोधात भाजपने मुंबईत तिरंगा रॅली काढली होती. या रॅलीची सांगता सभेत झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.

१८ पक्ष एकत्र येऊन १८०० लोक एकत्र करू शकले नाही. जेव्हा जेव्हा हे विरोधी पक्षात येतात. तेव्हा त्यांना संविधान बचाव आठवतो, आणि सत्तेत आले की संविधानची शपथ घेऊन देशाची लूट करतात. मुळात ही संविधान बचाव रॅली नाहीये तर पक्ष बचाव रॅली आहे. संविधानाच्या आड पक्ष बचावण्याचा हा प्रयत्न आहे अशी खरमरीत टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

एक चहा विकणारा व्यक्ति पंतप्रधान झाला हे विरोधकांना पचत नाहीये. पण हे विसरू नका, संविधानामुळेच ते देशाचे पंतप्रधान झाले आहे असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

तसंच संविधानाला वाचवणारे तुम्ही कोण? संविधान सक्षम आहे, जगात लोकशाही टिकली नाही. त्याच वेळी भारतात संविधानाने लोकशाही जिवंत राहिली. या आधीही संविधान तोडण्याचा प्रयत्न केला, त्यांचं लोकांनी कंबर मोडलं. 1975 मध्ये आणीबाणीमुळे जनतेनं इंदिरा गांधी यांना जागा दाखवली होती अशी टीका मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर केली.

तसंच सत्तेत असताना यांनी एका मिनिटात व्यापाऱ्याला कामाला मिलची जागा दिली पण बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी इंदू मिल ची जागा दिली नाही, ती जागा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

तोंडात बाबासाहेबांचं नाव घेतात आणि जातीवादी कृत्य करतात. जेव्हा जेव्हा काँग्रेस सरकार आले तेव्हा दलितांवर सर्वात जास्त अत्याचार झाले आहे असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला.

आम्ही दलितांच्या सुरक्षेसाठी काम करतोय. श्रीमंत आणि गरीबांमध्ये दरी निर्माण करण्याचं काम गेल्या 60 वर्षांपासून काँग्रेस करत आहे आणि राहुल गांधी आम्हाला जाब विचारत आहे अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 26, 2018 06:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close