राजकीय फायद्यासाठी भाजपने भुजबळांना बाहेर काढलं -राज ठाकरे

राजकीय फायद्यासाठी भाजपने भुजबळांना बाहेर काढलं -राज ठाकरे

पण भाजपने भुजबळांचं अटकेचं राजकारण केलं असा आरोप राज ठाकरेंनी केला.

  • Share this:

अंबरनाथ, 04 मे : तुमच्या गरजेसाठी छगन भुजबळांना बाहेर काढणार असाल आणि त्यांचा वापर करून घेणार असाल तर हे अत्यंत घाणरेडं राजकारण आहे अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर केली.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना अखेर जामीन मिळालाय. राज ठाकरे यांनी भुजबळांच्या जामिनीवरून भाजपवर टीका केलीये.

छगन भुजबळ यांच्याबद्दल जी चौकशी सुरू आहे ती होईल आणि त्यात दोषी आढळले तर भुजबळांना शिक्षा व्हायची ती होईल. पण भाजपने भुजबळांचं अटकेचं राजकारण केलं असा आरोप राज ठाकरेंनी केला.

कोर्टाने आधीच भुजबळांना जामीन देण्याबद्दल सांगितलं होतं. पण आपल्या राजकारणासाठी बाहेर काढण्यात आलं नाही. तुमच्या गरजेसाठी तुम्ही त्यांना बाहेर काढणार असाल आणि त्यांचा वापर करून घेणार असाल तर हे अत्यंत घाणरेडं राजकारण आहे अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 4, 2018 10:12 PM IST

ताज्या बातम्या