मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'स्वत:ला मुख्यमंत्री आणि मुलाला मंत्री करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सरकार बनवलं'

'स्वत:ला मुख्यमंत्री आणि मुलाला मंत्री करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सरकार बनवलं'

'रोज उठून सरकार आज जाईल उद्या जाईल अशा स्वप्नात आपण राहू नये.'

'रोज उठून सरकार आज जाईल उद्या जाईल अशा स्वप्नात आपण राहू नये.'

'रोज उठून सरकार आज जाईल उद्या जाईल अशा स्वप्नात आपण राहू नये.'

मुंबई 16 फेब्रुवारी : नवी मुंबईच्या नेरुळमध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्यस्तरीय अधिवेशन होतंय. या अधिवेशनाच्या निमित्ताने भाजप विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा संघटनात्मक बांधणीला सुरुवात करणार आहे. चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदी सूत्रं हाती घेतली. त्यानंतर झालेल्या भाषणात त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, हे सरकार पडावं अशी आम्ही वाट बघत नाही. मात्र आपसातील भांडणांमुळेच हे सरकार कोसळेल असंही त्यांनी सांगितलं.चंद्रकांत पाटील म्हणाले, माझ्यासारख्या राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या, सर्वसामान्य घरातून आलेल्या माणसाची दुसऱ्यांदा प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली याबद्दल नेते मंडळींचे आभार. शिवसेनेला ज्यांच्यामुळे स्थान मिळालं त्या रामभाऊ कापसे यांना शिवसेना विसरली. 1985 नंतर पहिल्यांदाच भाजपच्या रुपाने कुठल्या पक्षाला पुन्हा एकदा 100 जागा मिळाल्या. जनादेश हा युतीला मिळाला होता. पण अनैतिक युती झाली आणि आपल्याला बाजूला ठेवून सरकार स्थापन झालं. सर्वाधिक मतं राज्यात भाजपला 1कोटी 42 लाख मिळाली. लोकांनी भरभरुन मतदान केलं. लोकांची हीच इच्छा आहे की आपलं सरकार असावं. मात्र शिवसेनेनं दगाबाजी केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा करायला सेनेला वेळ होता पण देवेंद्रजींचा फोन घ्यायला वेळ नव्हता. संजय राऊत यांनी सांगितलं होतं की आम्ही भाजपसोबत राहायचं नाही हे आधीच ठरवले होतं, मग युती का केलीत ? फक्त स्वत:ला मुख्यमंत्री आणि मुलाला मंत्री करण्यासाठीच सरकार केलं गेलं.

केजरीवालांची 'फुकट'योजना राज्यात नको, पवारांनी काँग्रेसच्या मंत्र्याला फटकारलं

ते पुढे म्हणाले, सावरकरांना समलैंगिक म्हटलं जातं. आणि शिवसेना हे सहन करते. शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला गेला त्याबद्दल शिवसेना बोलत नाही. हे सरकार पाडण्यासाठी आपण काही करायचं कारण नाही. आपण एक सक्रिय विरोधक म्हणून काम करण्याची गरज आहे. उद्धव ठाकरे हे 25 आणि 50 हजार प्रति हेक्टरी मदत करण्याची गोष्ट करत होते. पण हिवाळी अधिवेशनात याविषयी चकार शब्द नाही. म्हणून मग फसवी कर्जमाफी घोषित केली. 2019-20 च्या कर्जमाफीचं काहीच बोलत नाहीत.

अखेर नाराज खडसे आले दुसऱ्यावरून पहिल्या रांगेत, भाजपच्या अधिवेशनात रंगलं नाट्य

राज्यातील महिला असुरक्षित झाल्या आहेत. सीएएच्या अंमलबजावणी करण्यात चालढकल केली जातेय. शिवाजी महाराजांचे स्मारकाचं यांनी 15 वर्षात काही केलं नाही. आम्ही शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या चौकशीला घाबरत नाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवली मग त्याला आणखी उशीर लागणार. रोज उठून सरकार आज जाईल उद्या जाईल अशा स्वप्नात आपण राहू नये.

VIDEO: उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे शरद पवार नाराज, जळगावमध्ये व्यक्त केली खंत

नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीत आपण विजयी झाले पाहिजे. सगळीकडे आता सगळे एकत्र आणि आपण एकटे अशी परिस्थिती आहे. या दोन्हीकडे आपल्याला विजय मिळाला पाहिजे
First published:

Tags: Chandrakant patil

पुढील बातम्या