महाआघाडीचं सत्तेचं 'फेव्हिकॉल' कधीतरी निघणारच, भाजपचा पलटवार

महाआघाडीचं सत्तेचं 'फेव्हिकॉल' कधीतरी निघणारच, भाजपचा पलटवार

तुम्ही मुंबईत काय केलं ते सांगा. मुंबईची अवस्था काय आहे ते सांगा. गुजरात हे देशातलं सगळ्यात चांगलं प्रगती करणारे राज्य आहे.

  • Share this:

मुंबई 17 फेब्रुवारी : भाजप आणि महाविकास आघाडीमधलं आरोप-प्रत्यारोपाचं युद्ध आता चांगलच रंगलय. गेले काही दिवस आरोपांच्या फैरी सुरु आहेत. आव्हानं-प्रतिआव्हानं दिली जात आहेत. राष्ट्रवादीच्या टीकेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर पलटवार केलाय. ते म्हणाले, सरकार पाडण्यात आम्हाला रस नाहीये आम्ही विरोधक म्हणून काम करत राहणार. आमची भूमिका बदलली नाहीये. आम्ही सरकारमध्ये येणार असं म्हणालो नव्हतो. सत्ताधाऱ्यांच्या विसंवादामुळे हे सरकार पडणार असं मी म्हणालो होतो. सत्तेच्या फेव्हिकॉलमुळे ते एकत्र आहेत. ते कधीतरी निघणारच. त्याच्यामुळे सरकारच्या जाण्याची आम्ही वाट पाहात नाही.

सामनावर टीका करताना ते म्हणाले, तुम्ही मुंबईत काय केलं ते सांगा. मुंबईची अवस्था काय आहे ते सांगा. गुजरात हे देशातलं सगळ्यात चांगलं प्रगती करणारे राज्य आहे. तुम्ही सारथीचं नाव बदलून पार्थी ठेवा, पण वेगळा पर्याय द्या. लोकांची कामं करा. तुम्ही पक्षांच्या नेत्यांनी वेगवेगळ्या बैठका ठेवल्या आहेत. त्यातूनच काहीतरी बातमी आज संध्याकाळपर्यंत येईल. ते सत्तेचं फेव्हिकॉल त्यांना एकत्र ठेवेल. ते कधीतरी निघेल. आमचा एकमेव पक्ष असा आहे पक्षांतर्गत निवडणुका लोकशाही मार्गाने होतात.

मुंबईच्या GST भवनाला 8व्या मजल्यावर भीषण आग, 300 कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका

राष्ट्रवादीने केली होती टीका

भाजपच्या राज्यव्यापी मेळाव्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. त्याला आता राष्ट्रवादीने उत्तर दिलंय. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी भाजपचे नेते आणि फडणवीसांवर सडकून टीका केलीय. भाजप नेत्यांना सत्तेचा आजार झाला आहे,दिवसभर सत्तेत कसा येऊ याचा विचार करतात, रात्री स्वप्न पडतात अशी टीका त्यांनी केलीय. हिंमत असेल तर भाजपने लोकसभेची निवडणूक घेऊन दाखवावी असं आव्हानही त्यांनी दिलं.

बारावीची परीक्षा उद्यापासून सुरू, 12 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी देणार पेपर

नवाब मलिक म्हणाले, भाजपचा हा सत्तेचा आजार वाढत जाणारा आहे. भाजपच्या नेत्यांनी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतले पाहिजे. अशा नेत्यांची जास्त काळजी वाटते. त्यांना चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन गेलं पाहिजे. आणि उपचारही केले पाहिजेत असंही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांना इतकंच सांगू की हिंमत असेल तर लोकसभा निवडणूक आता घ्या आणि सिद्ध करा.

First published: February 17, 2020, 1:36 PM IST

ताज्या बातम्या