अखेर नाराज खडसे आले दुसऱ्यावरून पहिल्या रांगेत, भाजपच्या अधिवेशनात रंगलं नाट्य

अखेर नाराज खडसे आले दुसऱ्यावरून पहिल्या रांगेत, भाजपच्या अधिवेशनात रंगलं नाट्य

ज्येष्ठ नेते एकनात खडसे दुसऱ्या रांगेत होते. त्यामुळे कुजबुज सुरु झाली होती. नंतर काही नेत्यांच्या ही बाब लक्षात आली.

  • Share this:

नवी मुंबई 16 फेब्रुवारी : नवी मुंबईच्या नेरुळमध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्यस्तरीय अधिवेशन होतंय. या अधिवेशनाच्या निमित्ताने भाजप विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा संघटनात्मक बांधणीला सुरुवात करणार आहे. चंद्रकांत पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर नवी कार्यकारिणी अस्तित्वात येणार आहे. पाटील यांना पक्षाचे राष्ट्रीय जे पी नड्डा यांनी पक्षाची सूत्रं दिलीत. सकाळच्या सत्रात जे पी नड्डांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रं चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिली. या अधिवेशनात पक्षातर्फे काही राजकीय प्रस्तावही मांडण्यात आलेत. यात प्रामुख्याने नागरिकत्व सुधारणा कायदा आणल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव संमत करण्यात आलं. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी व्यासपीठावर आज नाट्य बघायला मिळालं. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना दुसऱ्या रांगेत जागा मिळाली होती. मात्र नंतर कुजबूज रंगल्याने खडसेंना पहिल्या रांगेत बसविण्यात आलं.

व्यासपीठावर जे पी नड्डा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, विनय सहस्रबुद्धे, रावसाहेब दानवे, गणेश नाईक, विनोद तावडे, उदयनराजे भोसले, नारायण राणे, पंकजा मुंडे, सरोज पांडे, आशीष शेलार, प्रवीण दरेकर, मंगलप्रभात लोढा, विजया रहाटकर, खासदार कपिल पाटील, संघटन मंत्री व्ही सतीश, विजय पुराणिक, हंसराज अहिर चंद्रशेखर बावनकुळे, मंदा म्हात्रे, श्याम जाजू उपस्थित होते.

तर ज्येष्ठ नेते एकनात खडसे दुसऱ्या रांगेत होते. त्यामुळे कुजबुज सुरु झाली होती. काही नेत्यांच्या ही बाबत लक्षात येताच त्यांनी एकनाथ खडसेंना पहिल्या रांगेत बसायला जागा दिली. त्यामुळे नाराजी नाट्य बघायला मिळालं.

खेड शिवापूर टोल नाक्याचं आंदोलन पेटलं, आंदोलकांनी अडवला एक्सप्रेस वे

इथे पंतप्रधान मोदींचं गुणगान करणारी मोदी वॉल तयार करण्यात आली आहे. यात वृत्तपत्रांमध्ये आलेले मोंदीचे वेगवेगळे फोटो लावत त्यांचा गुणगौरव करण्यात आला आहे.

सत्ता स्थापनेचा विचार न करता भाजपने आता आक्रमक विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचे संकेतही या अधिवेशनातून दिले आहेत.

जामिया मारहाण प्रकरणी आत्तापर्यंतचा सगळ्यात धक्कादायक VIDEO व्हायरल

त्याचेच प्रत्यंतर पक्षाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात आलं. पक्षानं अधिवेशनाच्या ठिकाणी भाजप सरकार आणि महाविकास यांची तुलना करत सध्याच्या सरकारच्या कामाचे वाभाडे काढणारे बॅनर्स लावले आहेत. इतकेच नाही तर या सरकारची महा भकास आघाडी असा उल्लेखही करण्यात आलाय.

 

First published: February 16, 2020, 12:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading