Home /News /mumbai /

'तुम्ही शेण खायचे आणि समाजाला वेठीस धरायचे' चित्रा वाघ यांची संजय राठोड यांच्यावर सडकून टीका

'तुम्ही शेण खायचे आणि समाजाला वेठीस धरायचे' चित्रा वाघ यांची संजय राठोड यांच्यावर सडकून टीका

'पूजा चव्हाणाचा हत्यारा संजय राठोड आहे आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.

    मुंबई, 23 फेब्रुवारी : 'तुम्ही शेण खायचे आणि समाजाला वेठीस धरायचे, लाज तरी थोडी राहु द्या, ज्या ऑडिओ क्लिप समोर आल्या आहे. जे फोटो आले आहे, त्यावर कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही' अशा शब्दांत भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर सडकून टीका केली. 'पूजा चव्हाणाचा हत्यारा संजय राठोड आहे आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. बंजारा समाजाला समोर करून आपला बचाव करण्यासाठी हा केविलवाना प्रयत्न आहे. बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहोरादेवी अशा पवित्र ठिकाणी  संजय राठोड याने आपल्या पापाची कबुली दिली आहे' अशी टीका चित्रा वाघ यांनी केली. ‘फास्टर फेणे’च्या दिग्दर्शकाचा नवा प्रयोग;आता थीएटर होणार ‘झोंबीमय’, पाहा TEASER 'संजय राठोड यांना वाचवण्यासाठी तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये स्पर्धा रंगली आहे. ज्या प्रकार तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये जी एकी दिसली आहे ती भंडारा शासकीय रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणामध्ये दिसली नाही. बलात्काऱ्याला पाठीशी घालण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहे. त्यामुळे महिला सुरक्षेबद्दल बोलू नये, असंही वाघ म्हणाले. 'तुम्ही शेण खायचे आणि समाजाला वेठीस धरायचे, लाज तरी थोडी राहु द्या, ज्या ऑडिओ क्लिप समोर आल्या आहे. जे फोटो आले आहे, त्यावर कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही' असंही वाघ म्हणाल्या. गडा इलेक्ट्रॉनिक्सला लागणार टाळं?; जेठालाल सोडतोय गोकूळधाम सोसायटी पूजा चव्हाण प्रकरणी पुणे पोलिसांनी थातुरमातुर उत्तर दिले आहे. या प्रकरणात मुख्य संशयित संजय राठोड आहे. त्यांच्याबद्दल कोणतीही चौकशी केली जात नाही, त्यामुळे तो अहवाल आम्हाला मान्य नाही. आम्ही राज्यपाल आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार करणार आहोत, अशी माहितीही वाघ यांनी दिली.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: BJP, Modi government, Mumbai, Sanjay rathod, Uddhav thacakrey

    पुढील बातम्या