'हा मुंबईची शांतता बिघडवण्याच्या प्रयत्न'; क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचं नाव दिल्याने राजकीय वाद, अस्लम शेख करणार उद्घाटन
'हा मुंबईची शांतता बिघडवण्याच्या प्रयत्न'; क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचं नाव दिल्याने राजकीय वाद, अस्लम शेख करणार उद्घाटन
विश्व हिंदू परिषद (VHP) आणि भाजपने संकुलाच्या उद्घाटनावर आक्षेप घेतला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, की एखाद्या प्रकल्पाचं नाव “क्रूर हिंदूविरोधी” देणं निंदनीय बाब आहे.
मुंबई 25 जानेवारी : 18व्या शतकातील वादग्रस्त म्हैसूर शासक टिपू सुलतानच्या नावावर मुंबईतील क्रीडा संकुलाचे नाव दिल्याने (Mumbai Sports Complex Naming Tipu Sultan) राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. मुंबईतील मालाड येथील क्रीडा संकुलाचं उद्घाटन 26 जानेवारी रोजी काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Guardian Minister of Mumbai Aslam Shaikh) यांच्या हस्ते होणार आहे. विश्व हिंदू परिषद (VHP) आणि भाजपने संकुलाच्या उद्घाटनावर आक्षेप घेतला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, की एखाद्या प्रकल्पाचं नाव “क्रूर हिंदूविरोधी” देणं निंदनीय बाब आहे.
अजितदादा आणि आदित्य ठाकरेंचं 'मिशन मुंबई', 650 कोटींच्या निधीला मंजुरी
“हे नक्कीच आपल्या मुंबईची शांतता बिघडवण्याच्या उद्देशाने आहे आणि ते टाळता आलं असतं. आपला महाराष्ट्र ही संतभूमी आहे आणि एका प्रकल्पाला क्रूर, हिंदूविरोधी नाव देणं निंदनीय आहे, असं विहिंपचे प्रवक्ते श्रीराज नायर यांनी ट्विट केलं आहे. महाराष्ट्र भाजपने क्रीडा संकुलाचा फोटोही ट्विट केला आणि हजारो हिंदूंची कत्तल करणाऱ्या आणि हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करणाऱ्या टिपू सुलतानच्या नावावरून उद्यानाला नाव दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची निंदा केली.
“आपण भाजप सोडलं, हिंदुत्व नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी. मग, हजारो हिंदूंची कत्तल करणाऱ्या आणि हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करणाऱ्या ‘टिपू सुलतान’च्या नावावर तुम्ही मुंबईतील एका उद्यानाचं नाव कसं ठेवलं? शिवसेनेला टिपू सुलतान आवडू लागला आहे का?" असं ट्विट महाराष्ट्र भाजपने केलं आहे.
भाजपचं “संधीसाधू हिंदुत्व” हे केवळ सत्तेसाठी असल्याचे ठाकरे यांनी रविवारी म्हटलं आणि त्यांच्या पक्षाने भगव्या पक्षाशी युती करून 25 वर्षे वाया घालवल्याबद्दल खेद व्यक्त केला. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सेनेने 2019 च्या महाराष्ट्र निवडणुकीनंतर भाजपशी संबंध तोडले आणि राज्यात महाविकास आघाडी (MVA) सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हातमिळवणी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.