राज ठाकरेंना भाजपने दिलं 'राज'च्याच भाषेत उत्तर; शेअर केलं व्यंगचित्र

राज ठाकरेंना भाजपने दिलं 'राज'च्याच भाषेत उत्तर; शेअर केलं व्यंगचित्र

भाजपने व्यंगचित्राच्या माध्यमातून थेट टीका करण्याचं अस्त्र उगारलं आहे आणि भाजपने व्यंगचित्राचा पहिला फटकारा साक्षात राज ठाकरे यांच्यावर मारला आहे. पाहा हे चित्र

  • Share this:

मुंबई, 11 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि आता राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी विविध माध्यमांचा आधार घेत आहेत. राजकारणात सोशल मीडिया वॉर नवी नाही. एकमेकांच्या नेत्यांना कार्यकर्ते आणि सोशल मीडिया सेलच्या मदतीने ट्रोल करण्याची संधी हल्ली सगळेच पक्ष घेताना दिसतात. सोशल मीडियाच्या या लढाईत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रम्या नावाचं एक पात्र तयार केलं आणि त्या व्यंगचित्राच्या माध्यमातून प्रचार सुरू केला. पण रम्याचे डोस एवढे काही व्हायरल झाले नाहीत.

संबंधित - आता भाजपचा हा 'रम्या' पाजणार विरोधकांना डोस, पवारांवर म्हणाला...!

आता भाजपने व्यंगचित्राच्या माध्यमातून थेट टीका करण्याचं अस्त्र उगारलं आहे आणि भाजपने व्यंगचित्राचा पहिला फटकारा साक्षात राज ठाकरे यांच्यावर मारला आहे. राज ठाकरे यांच्या मुंबईतल्या पहिल्या सभेत त्यांनी केलेल्या भाषणात जनतेनं प्रबळ विरोधी पक्षनेता म्हणून आम्हाला निवडून द्यावं, असं सांगितलं.

संबंधित - कशाला हवाय विरोधी पक्ष? राज ठाकरेंनी केला खुलासा!

त्यावरून भाजपने राज ठाकरे यांची टिंगल केली आहे. त्यांना विनोदी पक्षनेता असं म्हटलं आहे.

वास्तविक, व्यंगचित्रांच्या फटकाऱ्यांनी विरोधकांना घायाळ करणं हा राज ठाकरे यांचा हातखंडा. ते स्वतः व्यंगचित्रकार असल्याने त्यांनी हे अस्त्र नेहमीच वापरलं. पण या वेळी मात्र भाजपने कुंचल्याचे फटकारे राज ठाकरे यांच्यावरच मारले आहेत.

VIDEO 'जाणिवा नसलेली लोकं म्हणजे जिवंत प्रेतं' : राज ठाकरेंचं UNCUT भाषण

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: October 11, 2019, 7:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading