मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत राडा

मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत राडा

शिवसेनेच्या नगरसेवकांकडून मारहाण झाल्यामुळे भाजपचे नगरसेवक अर्ध्या कार्यक्रमातून बाहेर पडले. शिवसेनेनं 'पंतप्रधान चोर आहेत' अशा देखील घोषणा दिल्या.

  • Share this:

05 जुलै : भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांना मारहाण झाली. मनपाच्या इमारतीत हा प्रकार घडला. शिवसेनेच्या नगरसेवकांकडून मारहाण झाल्यामुळे भाजपचे नगरसेवक अर्ध्या कार्यक्रमातून बाहेर पडले. शिवसेनेनं 'पंतप्रधान चोर आहेत' अशा देखील घोषणा दिल्या.

या राड्याआधी एक दुसरा तमाशा बीएमसीमध्ये सुरू होता. सुधीर मुनगंटीवार आज मुंबईच्या महापौरांना चेक देण्यासाठी आले होते. तर तिथेही सेना आणि भजापची जोरदार घोषणाबाजी सुरू होती. भाजपचे नगरसेवक मोदी मोदी अशा घोषणा देत होते. शिवसेनेचे नगरेसवकही मग कसे मागे राहतील. त्यांनीही घोषणाबाजी सुरू केली.

राज्याचे अर्थमंत्री, तेही आपल्याच पक्षाचे इथे हजर आहेत.जीएसटीबाबत एक गोष्ट इथे पार पडतेय याची कोणतीही तमा न बाळगता भाजपचे नगरसेवक वागत होते.

First published: July 5, 2017, 2:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading