'युती'चं अखेर ठरलं, उद्या होणार घोषणा; फडणवीस-ठाकरे शिष्टाई फळाला

हा पेच सुटावा यासाठी पडद्यामागून जोरदार प्रयत्न सुरू होते. दोनही पक्षांनी तुटेपर्यंत ताणून न धरता जागावाटपावर एकमत घडवून आणल्याने जागावाटप पूर्ण झाल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय.

News18 Lokmat | Updated On: Sep 23, 2019 07:39 PM IST

'युती'चं अखेर ठरलं, उद्या होणार घोषणा; फडणवीस-ठाकरे शिष्टाई फळाला

विवेक कुलकर्णी, मुंबई 23 सप्टेंबर : हो नाही म्हणता, म्हणता युतीचं अखेर ठरलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिष्टाईला फळ आलं असून दोन्ही पक्षांमध्ये तडजोड झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. सगळं गणित व्यवस्थित जमलं आणि अखेरच्या क्षणापर्यंत कायम राहिलं तर उद्या मंगळवारी (24 सप्टेंबर)ला युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एका संयुक्त पत्रकार परिषदेत युतीच्या जागावाटपाची घोषणा करतील. हा पेच सुटावा यासाठी पडद्यामागून जोरदार प्रयत्न सुरू होते. दोनही पक्षांनी तुटेपर्यंत ताणून न धरता  जागावाटपावर एकमत घडवून आणल्याने जागावाटप पूर्ण झाल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय.

उदयनराजेंकडून भाजपला पहिलं सरप्राईज, पक्षाध्यक्षांच्या मेळाव्याला गैरहजर

आज रात्रीपर्यंत सर्व चर्चा पूर्ण होऊन मुख्यमंत्री अमित शहा यांना सर्व माहिती सांगणार आहेत. त्यांची मान्यता मिळाली की घोषणा होणार आहे. तसं या आधीच अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांना चर्चेचे सर्व अधिकार दिले होते. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणतील तेच सूत्र फायनल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीची मान्यता ही केवळ औपचारिकताच आहे असं बोललं जातंय. युती' होणार हे आता नक्की असलं तरी जागावाटपाचं सूत्र काय राहिल याची उत्सुकता आता निर्माण झालीय. तुटेपर्यंत ताणलं गेलं नाही तर तोगडा निघणार आहे.

मनसेचं ठरलं... मराठवाड्यातील 46 जागांपैकी एवढ्या जागावर लढणार

मात्र जास्तच ताणलं गेलं तर चर्चा फिस्कटू शकते. पण त्याची शक्यता फार कमी असल्याचं बोललं जातय. मंत्रिस्तरावर तोडगा निघाला नसल्यानं आता थेट उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वाटाघाटी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मंगळवारपर्यंत तोडगा निघू शकतो अशी शक्यताही व्यक्त केली जातेय. गेली काही दिवस दोनही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती मात्र त्यात फारशी प्रगती झालेली नाही. आता वेळही कमी असल्याने मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेच वाटाघाटीच्या टेबलवर एकत्र आले आहेत.

Loading...

मंत्रालय म्हणजे आत्महत्या करण्याची जागा झालीय, अजित पवारांचा घणाघात

युतीच्या जागावटापात 50-50च्या फॉर्म्युल्यावर शिवसेना ठाम आहे. भाजपकडून चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन तर शिवसेनेकडून सुभाष देसाई यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र शिवसेना कमी जागा घ्यायला राजी झाली नाही. बदलती राजकीय परिस्थिती इतर पक्षांमधल्या नेत्यांचं भाजपमध्ये येणं. लोकसभेनंतर वाढलेली ताकद यामुळे जास्त जागा मिळाव्यात अशी भाजपची मागणी आहे. तर 50 टक्क्यांपेक्षा कमी जागा घ्यायला शिवसेना तयार नाही.

लोकसभा निवडणुकीत भाजपने तडजोड करत एक जागा शिवसेनेला दिली होती. त्यामुळे तोच लवचिकपणा विधानसभेत शिवसेनेने दाखवावा अशी अपेक्षाही भाजपची आहे. भाजपने जो अंतर्गत सर्व्हे केला त्यात स्वबळावर सत्ता मिळू शकते असं दिसून आल्याने भाजपचा आत्मविश्वास बळवला आहे. मात्र दिर्घपल्ल्याच्या राजकारणाचा दृष्टिकोन मुख्यमंत्र्यांचा असल्याने ते तडजोड घडवून आणतील अशीही शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2019 07:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...