भाजप शिवसेना एकत्र येणार, मनोहर जोशींच्या वक्तव्यावर शिवसेनेचा खुलासा

भाजप शिवसेना एकत्र येणार, मनोहर जोशींच्या वक्तव्यावर शिवसेनेचा खुलासा

भाजपचं गेल्या काही वर्षातलं वर्तन बघितलं तर ते आपल्या मित्रांना संपवणं असंच आहे. त्यामुळे शिवसेनेने वेगळी वाट निवडली.

  • Share this:

मुंबई 10 डिसेंबर : राज्यात नवं सरकार येवून अजुन 15 दिवसही झालेले नसतानाच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी एक दावा केलाय. त्यांच्या या दाव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जोशींच्या या दाव्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता होती. मात्र शिवसेनेने आता हात झटकले असून हे मत शिवसेनेचं नसून मनोहर जोशी यांचं वयक्तिक मत असल्याची प्रतिक्रिया शिवसनेच्या प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांनी दिलीय. विधानसभा निकालानंतर भाजप आणि शिवसेनेत कटुता निर्माण झाली. नवं सरकार सत्तेत आल्यानंतर ही कटुता जास्तच वाढलीय. तीस वर्षांची साथ सोडून शिवसेनेने जन्मापासून विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. एवढच नाही तर शिवसेना NDAतूनही बाहेर पडली. भाजपला धोबीपछाड देण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आल्याने भाजपला सत्तेबाहर राहावं लागलं आणि मोठा हादरा बसला.

चार दिवसांमध्ये दोन वेळा भेटले उद्धव ठाकरे आणि फडणवीस, पाहा PHOTOS

अशी परिस्थिती असताना जोशींच्या विधानामुळे खळबळ उडणं स्वाभाविक होतं.निलम गोऱ्हे म्हणाल्या, मनोहर जोशी यांच्या पीढीतल्या लोकांना असं वाटणं स्वाभाविक आहे. मात्र शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार बनवलंय. भाजपचं गेल्या काही वर्षातलं वर्तन बघितलं तर ते आपल्या मित्रांना संपवणं असंच आहे. त्यामुळे शिवसेनेने वेगळी वाट निवडली. जोशी यांचं मत हे शिवसेनेचं नसून त्यांचं वयक्तिक मत आहे असंही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

काय म्हणाले मनोहर जोशी?

काही लहान-सहान गोष्टींमुळे भाजप आणि शिवसेनात दुरावा निर्माण झालाय. मात्र तो दुरावा दोघांच्याही फायद्याचा नाही. दोनही पक्ष आता वेगळे झाले असले तरी ते पुन्हा एकत्र येणारच नाहीत असं नाही. ते एकत्र येवू शकतात. त्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे योग्यवेळी निर्णय घेतील असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

भाजप आणि शिवसेना एकत्र येतील, शिवसेना नेत्याच्या दाव्याने खळबळ

जोशी पुढे म्हणाले, राज्याच्या भल्यासाठी थोडा त्याग केला पाहिजे. आपल्याला जे वाटतं तसच घडेल असं नाही. त्यासाठी सगळ्यांनीच दोन पावलं मागे यावं असंही त्यांनी सूचवलं. जोशींच्या या दाव्यामुळे राजकारणात नवीन चर्चा सुरू झालीय. आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीन पक्षांचं सरकार चालवणं हे आव्हान असल्याचं म्हटलं होतं. 13 दिवसानंतरही खातेवाटप झालं नसल्यामुळे नाराजीही व्यक्त होतेय. या पार्श्वभूमीवर मनोहर जोशी यांच्या या दाव्याला महत्त्व प्राप्त झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2019 10:06 PM IST

ताज्या बातम्या