गणेश विसर्जनापूर्वी ठरणार 'युती'चा अंतिम फॉर्म्युला!

गणेश विसर्जनापूर्वी ठरणार 'युती'चा अंतिम फॉर्म्युला!

भाजप सेनेचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला तयार झाल्यावरच भाजपचे कार्यकारी अध्यक्ष शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई 9 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीसाठी  'युती'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अंतिम चर्चेला सुरुवात झालीय. या आधी प्राथमिक चर्चा झाली असली तरी ही चर्चा अंतिम फॉर्म्युला ठरविण्यासाठी असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झालंय. चर्चेच्या काही फेऱ्या झाल्या असून अजुन काही फेऱ्या होणार आहेत. झालेल्या चर्चेचा तपशील दोन्ही पक्षांचे नेते आपापल्या ज्येष्ठ नेत्यांना देत आहेत. अंतिम तोडगा निघाल्यानंतरच भाजपचे अध्यक्ष आणि उद्धव ठाकरे भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. गणेश विसर्जनापूर्वी हा तोडगा निघणार असल्याची शक्यता आहे.

भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन हे चर्चा करत असून शिवसेनेकडून सुभाष देसाई त्यात सहभागी आहेत. आज या सर्व नेत्यांमध्ये चर्चेच्या काही फेऱ्या झाल्यात मित्र पक्षांना द्यावयाच्या जागा आणि त्यानंतर दोन्ही पक्षांनी लढायच्या जागा, काही जागांची अदलाबदल अशा सर्व विषयांवर यात चर्चा झाली.

( वाचा : वंचित-MIMच्या युतीवर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले? पाहा VIDEO )

निवडून येण्याची ताकद हाच सर्वात महत्त्वाचा निकष असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय. काही ठिकाणी दोन्ही दोन्ही पक्षांचा दावा असून तिथेच थोडा पेच निर्माण झालाय. मात्र चर्चेच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा विश्वास दोन्ही पक्षांनी व्यक्त केलाय.

या चर्चानंतर चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना चर्चेची सर्व माहिती दिली. भाजप शिवेसेनेच्या बैठकीत काही जागांच्या अदलाबदली विषयी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तसंच घटकपक्षांना नेमक्या कोणत्या 18 जागा द्यायच्या याविषयी बैठकीत चर्चा झाली.

( वाचा : मोठी बातमी, उदयनराजे घेणार यू-टर्न? भाजप प्रवेशाबाबत नवा ट्विस्ट )

उद्या भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात कोणतीही बैठक होण्याची शक्यता नाही. भाजप सेनेचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला तयार झाल्यावरच भाजपचे कार्यकारी अध्यक्ष शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय.

First published: September 9, 2019, 3:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading