शिवसेना-भाजपचा नवा भिडू...काँग्रेस !

शिवसेना-भाजपचा नवा भिडू...काँग्रेस !

सेना-भाजपच्या अंतर्गत भांडणामुळे मात्र तिसऱ्या क्रमांकावरच्या काँग्रेसला सध्या फार महत्त्व आलं आहे

  • Share this:

प्रणाली कापसे, मुंबई

07 एप्रिल : खरंतर सेना-भाजपच्या मुंबई महापालिकेत जवळपास सारख्या जागा मिळाल्या. त्यामुळे सगळं राजकारण या दोनचं पक्षाभोवती फिरेल असं वाटलं होतं, तिसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला तसं फार काही महत्व उरणार नव्हतं. पण सेना- भाजपच्या अंतर्गत भांडणामुळे मात्र तिसऱ्या क्रमांकावरच्या काँग्रेसला सध्या फार महत्त्व आलं आहे.

सेना-भाजपपैकी कुणालाही आपला प्रस्ताव संमत करुन घ्यायचा असेल किंवा एखादा प्रस्ताव हाणून पाडायचा असेल तर त्याला काँग्रेसची मदत लागते. हे लागोपाठ दोन दिवस झालेल्या सभांमध्ये दिसून आलं.

बुधवारी स्थायी समितीमध्ये सेनेचं समर्थन असलेला सागवानी लाकडाच्या खुर्च्यांचा प्रस्ताव भाजपनं काँग्रेसला हाताशी घेवून हाणून पाडला होता. त्यामुळे सेनेला खूप मोठ्या नामुष्कीचा सामना करावा लागला. १४-६ अशा मतदानात भाजपचा विजय झाला.

आणि त्याला साथ दिली ती काँग्रेसनं.

तर गुरुवारी बेस्टच्या वरळी आणि बॅक बे डेपोला तेलाचा पुरवठा करण्यासाठी  रिलायन्सला परवानगी देण्याचा प्रस्ताव आला होता. हा प्रस्ताव सगळ्यात जास्त सुटका देणारा प्रस्ताव होता. प्रस्तावाला भाजपनं समर्थन देताच हा प्रस्ताव  सेना-काँग्रेसने विरोध करत हाणून पाडला.  यावेळी काँग्रेसनं सेनेला साथ दिली आणि ६-४ अशा मतदनात भाजपचा पराभव झाला. यावरून सहज स्पष्ट आहे, यापुढे सेना- भाजप आपआपल्या सोईचे प्रस्ताव संमत करण्यासाठी काँग्रेस नावाचा नवा भिडू लागणार आहे.

या भिडूचा आपापल्या सोईप्रमाणे हे दोन्ही पक्ष वापर करतील आणि वेळ आली की सोडून सुद्धा देईल. तोपर्यंत काँग्रेसची मात्र चंगळ आहे. कारण त्यांना दोन्ही पर्याय खुले आहे. स्वतःला वाटेल तो प्रस्ताव हाणून पाडण्याची खरी ताकद आज काँग्रेसकडे आहे. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर असूनही सध्या सगळ्यात जास्त ताकदवान पक्ष काँग्रेस ठरतोय.

First published: April 7, 2017, 10:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading