Elec-widget

'युती'चं घोडं अडलं आता या पाच जागांवर; तुटेपर्यंत ताणणार नाही!

'युती'चं घोडं अडलं आता या पाच जागांवर; तुटेपर्यंत ताणणार नाही!

दोनही पक्षांमध्ये जोरदार इन्कमिंग झाल्यामुळे परिस्थिती बदललीय या बदलत्या परिस्थित काही अडचणी असल्याने हा विलंब होत असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

  • Share this:

उदय जाधव मुंबई 25 सप्टेंबर : भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात आलीय. शेवटच्या 11 जगांचा प्रश्नं काही प्रमाणात सुटून तो आता फक्तं 5 जागांच्या तडजोडीवर आलाय. आता 5 विधानसभा मतदारसंघातील तीढा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात होणाऱ्या अंतीम चर्चेतून सोडवला जाणार आहे. युतीच्या जागावाटपात दोन्ही पक्षांनी युती तूटेल अशी कोणतीही परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी घेतल्यामुळे युती अभेद्य रहाणार असल्याचं दिसतंय. दोनही पक्षांमध्ये जोरदार इन्कमिंग झाल्यामुळे परिस्थिती बदललीय या बदलत्या परिस्थित काही अडचणी असल्याने हा विलंब होत असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. तुटेपर्यंत ताणणार नाही असं दोन्ही पक्षांनी ठरविल्यामुळे युती तुटणार नाही हे निश्चत समजलं जातंय.

विधानसभेआधी राजू शेट्टींना दुसरा मोठा धक्का, प्रदेशाध्यक्ष भाजपमध्ये प्रवेश करणा

या पाच जागांवर अडलं घोडं

1) औसा, लातूर जिल्हा

2) वडाळा, मुंबई

Loading...

3) एरोली, ठाणे

4) बेलापूर, ठाणे

6) उल्हासनगर, ठाणे

आधी होता 12 जागांवर तिढा

मागील विधानसभा निवडणुकीत गेल्या 25 वर्षांपासून अभेद्य असलेली शिवसेना-भाजपची युती तुटली. त्यानंतर राज्यात भाजपने आपली वाढलेली ताकद दाखवून देत 122 जागांपर्यंत मजल मारली. यंदा मात्र दोन्ही पक्षांनी एकत्रिपणे विधानसभा निवडणुकांचा सामना करत आहेत. मात्र काही जागांवरून युतीचं घोड अडलं आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील माण, वाई, अक्कलकोट, पंढरपूर, फलटण, कागल तसंच विदर्भातील देवळी, रिसोड, गोंदिया आणि मुंबईतील वडाळा, शिवाजीनगर आणि ठाण्यातील उल्हासनगर या जागांचा समावेश आहे.

'मी स्वत:हून EDच्या कार्यालयात जाणार, माहिती हवी असेल तर देऊन येतो'

युतीच्या जागावटापात 50-50च्या फॉर्म्युल्यावर शिवसेना ठाम आहे. भाजपकडून चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन तर शिवसेनेकडून सुभाष देसाई यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र शिवसेना कमी जागा घ्यायला राजी झाली नाही. बदलती राजकीय परिस्थिती इतर पक्षांमधल्या नेत्यांचं भाजपमध्ये येणं. लोकसभेनंतर वाढलेली ताकद यामुळे जास्त जागा मिळाव्यात अशी भाजपची मागणी आहे. तर 50 टक्क्यांपेक्षा कमी जागा घ्यायला शिवसेना तयार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2019 04:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...