भाजपची पहिली यादी: 12 जणांचा पत्ता कट, हे दिग्गज गॅसवर!

विधानसभा निवडणुकीसाठी अखेर भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली.

News18 Lokmat | Updated On: Oct 1, 2019 02:19 PM IST

भाजपची पहिली यादी: 12 जणांचा पत्ता कट, हे दिग्गज गॅसवर!

मुंबई, 01 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीसाठी अखेर भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपने 125 जणांची पहिली यादी जाहीर केली. यात अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह काही महत्त्वाच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. पक्षाने पहिल्या यादीत 12 विद्यमान आमदारांचा पत्ता कट केला आहे.तर विद्यमान 12 आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. पण या यादीत पक्षाने अनेक दिग्गज नेत्यांना वेटिंगवर ठेवले आहे.

भाजपने पुण्यातील कोथरूड येथून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातील भाजपच्या विद्यमान आमदार मेघा कुलकर्णी यांचा पत्ता कट केला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, प्रकाश मेहता आणि विनोद तावडे या नेत्यांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आले नाही. मुक्ताईनगर हा खडसे यांचा मतदारसंघ आहे. प्रकाश मेहता यांचा घाटकोपर पूर्व तर विनोद तावडे यांचा बोरिवली हा मतदारसंघ आहे. या तिन्ही नेत्यांना पक्षाने गॅसवर ठेवले आहे. विशेष म्हणजे निवडणुकीच्या आधी पक्षात प्रवेश करणाऱ्या नेत्यांना पहिल्याच यादीत स्थान देण्यात आले आहे.

या विद्यमान आमदारांचा पत्ता कट

मुलुंड- सरदार तारा सिंग (नवा उमेदवार- मिहीर कोटेचा)

Loading...

पुणे कॉन्टेमेंट- दिलीप कांबळे( सुनील कांबळे (भाऊ))

विक्रमगड- विष्णू सावरा हेमंत सावरा (मुलगा)

शिवाजी नगर- विजय काळे(सिद्धार्थ शिरोळे)

कोथरुड-मेधा कुलकर्णी (चंद्रकांत पाटील

माजलगाव- आर टी देशमुख (मेश अडसकर)

आर्णी- राजू तोडसम (संदीप धुर्वे )

288 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

- अधिसूचना - 27 सप्टेंबर.

- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख - 4 ऑक्टोबर.

- उमेदवारी अर्ज छाननी - 5 ऑक्टोबर.

- उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख - 7 ऑक्टोबर

- उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी दोन पर्यवेक्षक पाठवणार

- 2 नोव्हेंबरपूर्वी निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण होणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2019 01:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...