पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार का? राधाकृष्ण विखेंचा मोठा खुलासा

पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार का? राधाकृष्ण विखेंचा मोठा खुलासा

माझी बदनामी करण्याची कुणीतरी सुपारी घेतली आहे अशी गंभीर टीका यावेळी विखेंनी केली.

  • Share this:

हरीष दिमोटे, प्रतिनिधी

शिर्डी, 28 डिेसेंबर : काँग्रेस पक्षातून भाजपात दाखल झालेले राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा काँग्रेसमध्ये स्वगृही परतणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत तर दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातील पराभूत आमदारांनीही विखेंविरोधात भुमिका घेतल्याचं चित्र आहे. पण यावर पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार का? असा प्रश्न विचारला असता राधाकृष्ण विखेंनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. माझी बदनामी करण्याची कुणीतरी सुपारी घेतली आहे अशी गंभीर टीका यावेळी विखेंनी केली.

'मी काँग्रेस पक्षात स्वगृही परतणार या बातम्या निराधार आहेत. अशा अफवा पसरवून कोणीतरी मला बदनाम करण्याची सुपारी घेतली' असल्याचं विखे म्हणाले आहेत. माझे सर्व पक्षातील नेत्यांशी संबंध आहेत. त्यामुळे मी सार्वजनिक जीवनात कुणाला भेटायचंही नाही का? राजकीय जीवनात आता कुणाशी संबधही ठेवायचे नाही का? असा संपप्त सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, 27 डिसेंबरला राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लीकार्जुन खर्गे यांची एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये भेट घेतली होती. त्यामुळे विखे आता पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर प्रश्न विचारला असता व्यक्तीगत संबध ठेवू नये हि भुमिका दुर्दैवी आहे. विघ्न संतोषी लोक अशा प्रकारे संभ्रम पसरवताहेत. चुकीच्या पद्धतीने बदनामी करणारांविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचंही विखे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांच्या मागे कायम उभे राहणार आहे. त्यामुळे मी काँग्रेसमध्ये जाणार नसून भाजप कधीही सोडणार नसल्याची ठाम भूमिका विखे पाटील यांनी मांडली आहे. एकीकडे विखेंनी भूमिका स्पष्ट केली असताना दुसरीकडे  विखे पाटील यांनी स्वगृही परत येण्याचे ठरवले जरी असले तरी त्यांच्या परतीच्या निर्णय हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावरही अवलंबून असणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय हा अध्यक्षा सोनिया गांधी घेणार आहे. विशेष म्हणजे, विखे पाटील पक्षात परत यावे अशी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची इच्छा आहे. त्यासाठीच त्यांचे प्रयत्न देखील सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

विशेष म्हणजे, भाजपमध्ये कमालीची धुसफूस सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षात वाढलेल्या नाराजीवर मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक कामगिरीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री राम शिंदे हे पहिल्यांदाच एकमेकांसमोर आले.

भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या बैठकीमध्ये माजी मंत्री राम शिंदे यांनी विखे पाटील यांच्यामुळे पराभव झाल्यानं नाराजी व्यक्त केली होती. त्याबद्दल काही प्रश्न होते ते बैठकीत त्यांनी विचारले. त्यावर उत्तरे मिळाली असल्याचंही राम शिंदे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं.

राम शिंदे म्हणाले होते की,  विखे पाटील आणि आम्ही पहिल्यांदाच समोरासमोर आलो. दोघांनीही पक्षासमोर एकमेकांची भूमिका मांडली. आता यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. अहमदनगर जिल्हा कोअर कमिटीचे सदस्य आणि प्रदेश नेतृत्व यांच्यात चर्चा झाली. विधानसभा निवडणूकीसह जिल्हा परिषदेबाबत तासभर चर्चा झाली.

विधानसभा निवडणुकीत जे काही झालं त्याबद्दल सर्व उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेतलं आहे. दोन्ही बाजू ऐकून घेतल्या असून आमचं समाधान झालं आहे. आता यावर विजय पुराणिक हे भाजपचे संघटन मंत्री अहवाल सादर करतील आणि त्यानंतर पुढची कार्यवाही करतील असंही राम शिंदे यांनी सांगितलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 28, 2019 02:58 PM IST

ताज्या बातम्या