मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /सामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजपचं ठाणे रेल्वे स्टेशनवर आंदोलन, ट्रेनमध्ये घुसलेल्या आंदोलकांसोबत पोलिसांची धक्काबुक्की

सामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजपचं ठाणे रेल्वे स्टेशनवर आंदोलन, ट्रेनमध्ये घुसलेल्या आंदोलकांसोबत पोलिसांची धक्काबुक्की

 सर्वसामान्यांसाठी लोकल (Mumbai Local) सेवा पूर्ववत सुरु करावी यासाठी आज ठाणे (Thane) भाजपच्या (Bjp) वतीने रेल्वे प्रवेश आंदोलन (Thane Bjp Protest) करण्यात आले.

सर्वसामान्यांसाठी लोकल (Mumbai Local) सेवा पूर्ववत सुरु करावी यासाठी आज ठाणे (Thane) भाजपच्या (Bjp) वतीने रेल्वे प्रवेश आंदोलन (Thane Bjp Protest) करण्यात आले.

सर्वसामान्यांसाठी लोकल (Mumbai Local) सेवा पूर्ववत सुरु करावी यासाठी आज ठाणे (Thane) भाजपच्या (Bjp) वतीने रेल्वे प्रवेश आंदोलन (Thane Bjp Protest) करण्यात आले.

ठाणे, 06 ऑगस्ट: सर्वसामान्यांसाठी लोकल (Mumbai Local) सेवा पूर्ववत सुरु करावी यासाठी आज ठाणे (Thane) भाजपच्या (Bjp) वतीने रेल्वे प्रवेश आंदोलन (Thane Bjp Protest) करण्यात आले. या आंदोलना दरम्यान भाजपचे स्थानिक आमदार आणि नेत्यांनी रेल्वे प्रवास करण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित पोलिसांनी त्यांना तसे करण्यापासून रोखलं. त्यामुळे भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त करत सरकारचा जाहीर निषेध केला.

कोविड काळात लॉकडाऊन झाला आणि मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवा बंद करण्यात आली. गेले जवळपास दीड वर्ष ही लोकल सेवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आल्याने चाकरमान्यांचे अतोनात हाल होत आहेत. अनेकांना आपला रोजगार गमवावा लागल्याने उपासमारीची वेळ आली आहे. मुंबईकडे कामानिमित्त जाणाऱ्यांची संख्या लाखात असून सध्या या सर्वांना बस शिवाय पर्याय उरलेला नाही. त्यात देखील प्रचंड वाहतूक कोंडीमुळे एक तासाच्या अंतराला दोन ते तीन तास लागत असल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. याचाच निषेध करण्यासाठी आज ठाण्यातील भाजप आमदार संजय केळकर निरंजन डावखरे आणि भाजप अध्यक्षा मृणाल पेंडसे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे प्रवास करण्याचा प्रयत्न केला.

ठाणे रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या एका लोकलमध्ये जबरदस्ती प्रवेश करताच उपस्थित पोलिसांनी त्यांना रोखले आणि मोठ्या प्रमाणात धक्काबुक्कीला सुरुवात झाली. पोलिसांनी सर्व भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना रेल्वे प्रवासासाठी मज्जाव केल्याने संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे सरकारचा जोरदार निषेध करत घोषणाबाजी केली.

ठाकरे सरकारने डान्स बार उघडले. मात्र मंदिरं बंद का असा खडा सवाल आमदार संजय केळकर यांनी केला. विमानप्रवास करायला परवानगी असताना केवळ रेल्वे प्रवासालाच मज्जाव का केला जात आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

सध्या सरकारी कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि वकील यांना रेल्वे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र सामान्य जनता अजूनही रेल्वे प्रवासापासून वंचित आहे. जर सामान्य माणसांच्या रेल्वे प्रवासावर अशीच बंदी कायम राहिली तर लाखो नागरिकांच्या नोकऱ्यांवर गदा येईल आणि मोठ्या प्रमाणावर उपासमारीची वेळ नागरिकांवर येईल.

First published:
top videos

    Tags: BJP, Thane