Home /News /mumbai /

राज्यात अराजकतेची स्थिती पण राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी नाही : आशिष शेलार

राज्यात अराजकतेची स्थिती पण राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी नाही : आशिष शेलार

BJP Press Conference in Mumbai: महाराष्ट्रात अराजकतेची स्थिती असल्याचं भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

मुंबई, 23 एप्रिल : मुंबईत काल भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाडीवर झालेला हल्ला, भाजपने आयोजित केलेल्या पोलखोल साठीच्या रथाची तोडफोड आणि राणा दाम्पत्याच्या घराबाहेर शिवसैनिकांकडून सुरू असलेला गोंधळ, घोषणाबाजी यावर भाजप नेत्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी म्हटलं, आमच्या पोल खोल आंदोलनात शिवसैनिकांनी दहशत माजवली. कांदिवलीमध्ये स्टेज तोडला... दहीसरलाही तोच प्रकार घडला. मोहित कंम्बोज रस्त्याने जात असताना त्यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्नं केला. नवनीत राणा यांच्या घराखालील बॅरिकेडिंग तोडून त्यांच्या घराखाली शिवसैनिक जमलेत. हे सरकार पुरस्कृत आंदोलन सुरू आहे. आमच्या शेपटावर पाय ठेवून आम्हाल डिवचण्याचा प्रयत्नं केलात तर आम्ही ही गप्प बसणार नाही. आम्ही मुंबई पोलीस आयुक्तांना भेटून निवेदन देणार आहोत. भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी म्हटलं, भाजपची अशी कुठलीही मागणी नाही की, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी. केवळ व्हॉट्सअप सर्क्युलट केलं तर त्याचा डोळा फोडा, कुणी सरकारच्या विरोधात हबोललं तर त्याचं घर तोडा, लॉकडाऊनच्या काळात गुंड का फिरत आहेत अशी कुणी पत्रकाराने स्टोरी केली तर त्याला घरातून फरफटत आणा अशी खूप उदाहरण देता येतील. जे सत्तेत बसले आहेत त्यांना सत्तेचा माज आला आहे, कायद्याचं राज्य कसं चालवायचं त्याचं त्यांना भान राहिलेलं नाहीये. हा सत्तेचा माज जनतेच्या न्यायालयात उतरवण्यासाठी पोलखोल आहे. राष्ट्रपती राजवटीचा विषय भाजपचा नाहीये. वाचा : अमरावतीहून आले राणा, मुंबईत झाला राडा; ट्विट करत संजय राऊतांनी दिला सूचक इशारा राज्यात अराजकतेची स्थिती आहे हे आमचं म्हणणं आहे. महाराष्ट्रातील अराजकतेची स्थिती आहे पण राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी नाही. राज्यातील अवस्था बिकट करुन, कायदा -सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन संजय राऊत उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी स्थिती ते का करत आहेत याचं उत्तर त्यांनी अंतर्गत समजून घेतलं पाहिजे. भाजप लोकशाहीला लोकशाहीनेच उत्तर देईन. ठोकशाहीला ठोकशाहीने उत्तर देण्याची समर्थता ठेवेन. झुंडशाहीचे प्रयत्न कालपासून सुरू केले असतील त्याला लोकशाहीने उत्तर देण्यात येईन असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. पक्षपातीपणासाठी कायदा आंधळा होतो. गृह विभागाकडून पक्ष पातीपणा होतोय. शरद पवारांच्या घरावर कुणी चाल करुन गेलं तर त्याला वेगळा न्याय आणि खासदार नवनीत राणा यांच्या घरावर कुणी हल्ला केला तर त्याला वेगळा न्याय. पक्षपातीपणा इथे आहे. धनंजय मुंडे यांच्या व्यक्तीगत आयुष्यातील प्रकरणात वेगळा न्याय आणि गणेश नाईक यांच्यावर केलेल्या आरोपात वेगळा न्याय. कायदा पक्षपाती पणे वागत आहे असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Ashish shelar, BJP, Maharashtra News

पुढील बातम्या