अमित शहा 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार

अमित शहा 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार

  • Share this:

15 जून : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे अमित शहा अध्यक्ष झाल्यापासून पहिल्यांदाच 'मातोश्री'वर जाणार आहेत. या भेटीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची चर्चा होण्याची शक्यता आहे.

शहा हे रविवारी सकाळी 11 वाजता ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी दाखल होतील, अशी माहिती शिवसेनेचं मुखपत्र सामनात देण्यात आली आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची मतं भाजपला महत्त्वाची असल्यानं ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या दोन्ही राष्ट्रपती निवडणुकीच्यावेळी शिवसेनेने एनडीएत असूनही युपीएच्या उमेदवाराला मतं दिली होती. त्यामुळे आता खुद्द अमित शहा यांनीच पुढाकार घेतला आहे.

त्याचबरोबर गेल्या काही महिन्यांपासून विविध मुद्द्यांवरुन शिवसेना आणि भाजपमधले संबंध ताणले आहेत. त्यामुळे अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत नेमकं काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

अमित शहा 16 ते 18 जून या कालावधीत मुंबईत येत असून आगामी निवडणुकीसाठी संघटनात्मक तयारी आणि आमदार, खासदार व मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत.

First published: June 15, 2017, 9:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading